MNS protest Agrowon
ॲग्रो विशेष

Declare a drought : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; मनसेची निदर्शने

Drought in Latur : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

Team Agrowon

MNS protest : लातूर जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. पिके वाळून चालल्याने शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी आक्रमक होत मनसेने शुक्रवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली. या आठवड्यात जर शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला, तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा श्री नागरगोजे यांनी दिला. आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली.  या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, सचिन सिरसाट, प्रीती भगत, किरण चव्हाण, अंकुश शिंदे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या...

  •   लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा  

  •   मनमानी करणाऱ्या पीकविमा कंपन्यांना काळ्या यादीत टाका

  •   पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ द्यावी

  •   बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी

  •   खत, बियाण्यांची लिंकिंग करण्यावर कारवाई करा

  •   चढ्यादराने खत, बियाण्याची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा केंद्रावर करावी करा

  •   गोगलगाय व इतर रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT