Taloda Market Committee Election
Taloda Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Taloda Market Committee Chairman : तळोदा बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार पाडवी

Team Agrowon

Nandurbar Market Committee News : तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य साठविण्यासाठी भविष्यात कोल्डस्टोअरेज, परिसराचे सुशोभीकरण, शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह, उपाहारगृहासारख्या सुविधा व शेतकरीहिताचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार राजेश पाडवी व उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड बाजार समितीच्या विशेष सभेत करण्यात आली. सभेचे अध्यक्ष अध्यासी अधिकारी सचिन खैरनार होते.

सभेत सभापतिपदासाठी आमदार राजेश पाडवी व उपसभापतिपदासाठी हितेंद्र क्षत्रिय यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. आमदार राजेश पाडवी यांच्या नामनिर्देशनात सूचक म्हणून संचालक कल्पेश माळी, तर अनुमोदक नीरज सुरेश पाटील होते.

तर दुसरीकडे हितेंद्र क्षत्रिय यांच्या नामनिर्देशनात सूचक म्हणून लताबाई मराठे व अनुमोदक रवींद्र गाढे होते.

दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी सचिन खैरनार यांनी आमदार राजेश पाडवी यांची सभापती म्हणून व उपसभापती म्हणून हितेंद्र क्षत्रिय यांची निवड जाहीर केली. दुसरीकडे राष्ट्रवादीला उपसभापतिपद मिळाल्याने माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे बाजार समितीत वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या वेळी बाजार समितीचे सर्व संचालक डॉ. शशिकांत वाणी, योगेश चौधरी, कल्पेश माळी, सुरेश इंद्रजित, अमृत मराठे, प्रकाश माळी, रेखा माळी, कल्पनाबेन चौधरी, नीरज पाटील, अमोल भारती, रोहिदास पाडवी, सत्तरसिंग राजपूत, गौतमचंद जैन, निखिलकुमार तुरखिया, रवींद्र गाढे उपस्थित होते. बाजार समिती आवारात जितेंद्र सूर्यवंशी, गौरव वाणी उपस्थित होते.

धडगाव बाजार समिती सभापतिपदी जामसिंग पराडके बिनविरोध

धडगाव (जि.नंदुरबार) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी २ मेस निवडणूक निर्णय अधिकारी किसन गावित, निवासी नायब तहसीलदार अक्राणी व सहाय्यक निवडणूक अधिकारी सी. के. पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली.

या सभेत जामसिंग पारशी पराडके व ईश्वर हारसिंग पावरा यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.

दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किसन गावित यांनी सभापतिपदीर जामसिंग पारशी पराडके, तर उपसभापतिपदी ईश्वर हारसिंग पावरा यांची निवड जाहीर केली. दरम्यान, धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही बिनविरोध झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT