Minister Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Abdul Sattar : पणनमंत्री सत्तार यांचा परिषदेतून काढता पाय

Team Agrowon

Pune News : बाजार समित्यांच्या विकासकामांच्या १२ (१) च्या परवानग्यांसाठी पणन संचालनालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप बाजार समिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर करताच श्री. सत्तार आकांडतांडव करत सभागृह सोडून गेले. पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांच्या परिषदेचे गुरुवारी (ता.३) निगडी येथे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी हा प्रकार घडला.

या परिषदेत राज्यभरातील बाजार समित्यांचे सभापती, संचालक, सचिव सहभागी झाले होते. श्री. सत्तार यांनी द्वीपप्रज्ज्वलन करून परिषदेचे उद्‌घाटन केले. सुरुवातीला मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर बाजार समिती सभापती आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांपुढील अडचणींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

बाजार समित्यांच्या विविध विकासकामांच्या १२ (१) परवानग्यांसाठी पणन संचालनालयातून अडवणूक आणि आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप अनेकांनी केला. यावर मंत्री सत्तार यांनी आक्षेप घेत, आरोप-प्रत्यारोप करू नका, प्रश्न मांडा, अशी सूचना केली. तरीही सभापती, संचालकांनी केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ सभागृहात घोषणाबाजी सुरू राहिली. त्यामुळे श्री. सत्तार आकांडतांडव करत सभागृह सोडून गेले. त्यानंतर बाजार समिती सभापती, सचिवांनी मंत्री सत्तार यांचा निषेध करीत घोषणाबाजी केली.

दरम्यान, बाळासाहेब नाहटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. १२ (१) चे प्रस्ताव आठ दिवसांत मार्गी न लागल्यास पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दांगट समितीचा अहवाल न स्वीकारल्यास सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊ, तसेच सत्ताधारी ज्या-ज्या ठिकाणी निवडणुकीस उभे राहतील त्यांना पाडू, असा निर्धारही या वेळी करण्यात आला.

सोमवारी बाजार समित्या बंद

श्री. सत्तार यांच्या निषेधाचा ठराव करून सोमवारी (ता. ७) बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी जाहीर केला. तसेच निषेधाचा हा ठराव आज (ता. ४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मालेगाव (जि. नाशिक) येथे देण्यात येणार असल्याचे श्री. नाहटा यांनी सांगितले. संतप्त सभापती आणि संचालकांनी व्यासपीठावर येऊन मंत्री सत्तार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत पत्रके फाडून फेकली. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत सर्वांनी सभागृह दणाणून सोडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming : रासायनिक खतांच्या कमी वापरावर भर

Vegetable Cultivation : चांगल्या पाऊसमानामुळे भाजीपाला लागवड वाढली

Warehouse Construction : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Indian Agriculture : ‘पायाभूत सुविधां’मुळे शेतीत बदलाचे वारे

Orange Fruit Fall : फळगळ आख्यान

SCROLL FOR NEXT