Minister Abdul Sattar agrowon
ॲग्रो विशेष

Minister Abdul Sattar : कृषी विभागाच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

sandeep Shirguppe

State Board of Agricultural Marketing Minister Abdul Sattar : पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून भष्ट्राचार होत असल्याचा आरोपावरून पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेरल्याने मंत्री सत्तार यांनी राज्यस्तरीय परिषदेच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती संघाच्यावतीने, निगडीतील (पुणे) ग. दि. माडगुळकर सभागृहात गुरुवारी (ता.३) राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. परंतु यावेळी काही कार्यकर्त्यांनी पणन मंत्रालयात होत असलेल्या घोटाळ्यावर भाष्य केल्याने मंत्री सत्तार यांनी या कार्यक्रमातून अर्ध्यांतूनच काढता पाय घेतला.

सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड तास उशीराने पोहोचले. तेथे आल्यानंतर कार्यक्रमावेळी सभागृहात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पणन विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत आरोप केले. यावेळी सत्तार म्हणाले की, केवळ प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे आहे, असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. अचानक सत्तार परिषदेतून निघून गेल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आणि चिडलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीण कुमार नहाटा, पुणे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून ३०६ बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव उपस्थित होते.

ही परिषद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्री यांची वेळ घेऊनच ठरविण्यात आली होती. या परिषदेसाठी कृषी उत्पन्न समितीचे पदाधिकारी लांबून आले होते. मात्र, कॅबिनेट बैठकीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिले; तर अब्दुल सत्तारही अवघ्या पाच मिनिटांत समस्या न ऐकता सभेतून निघून गेल्याने समिती सदस्यांनी नाराजी दर्शविली.

पदाधिकाऱ्याचे ठिय्या आंदोलन

बाजार उत्पन्न समित्यांची बैठक सायंकाळी ७ पर्यंत चालणार होती. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती व अंब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याने परिषद पाचच्या सुमारास संपवावी लागली. त्यानंतर, चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यगृहासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला.

येत्या ७ तारखेला बंदची हाक

या परिषदेला आलेले सदस्य हे गावगाडा चालवणारे आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले न गेल्याने बाजार समितीचे सदस्य नाराज झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सोमवारी ७ ऑक्टोबरला राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवणार आहोत. त्याबाबत एकमत झाल्याचे बाळासाहेब नहाटा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT