Agricultural Tractor Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Tractor and Implements : बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर अवजारे

Rural Development : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाह्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे पुरवण्याची योजना सुरू केली आहे.

Team Agrowon

Solapur News : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाह्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे पुरवण्याची योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाह्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावेत. स्वयंसाह्यता बचत गटातील टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसाह्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा साडेतीन लाख रुपये इतकी राहील.

स्वयंसाह्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या ९० टक्के (कमाल ३ लाख १५ हजार) शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पॉवर टिलर व मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ दिला जाणार नाही.

स्वयंसाह्यता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतर सदरची वस्तू गहाण किंवा विकता येणार नाही. स्वयंसाह्यता बचत गटांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असावे व सदर खाते आधार कार्डशी संलग्न असावे. स्वयंसाह्यता बचत गटांचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. बचत गटांतील सर्व सदस्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, ग्रामसेवक सरपंच व तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावे. प्राप्त उद्दिष्टानुसार व उपलब्ध तरतुदींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT