Soybean Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : नुकसानग्रस्त लाखो हेक्टर सोयाबीन वाळले; सर्व्हे कधी?

Soybean Crop Dried Up : नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश असूनही अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत. तसे आदेश प्रशासनाने दिले नसल्याची बाब समोर आली असून, हा विलंब शेतकऱ्यांचे आणखी नुकसान करणारा ठरण्याची भीती आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र या पिकावर रोगांचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे जुलैमध्ये पिकांचे नुकसान झाल्यानंतर बुरशीजन्य रोगांमुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनला फटका बसला. परिणामी उत्पादनात ४० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज कृषी विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’सह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडून वाळत आहे.

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले. तरीही नांदेडला मात्र प्रशासन स्तरावरून अद्याप पंचनामे करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले नाहीत.

कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पिकांच्या पंचनाम्याचे तोंडी आदेश दिले आहेत. लेखी आदेश देण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत.
- भाऊसाहेब ब‍ऱ्हाटे, अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT