Bird Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Migrated Birds : स्थलांतरित पक्ष्यांनी पाणथळी गजबजल्या

Bird Migration : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलले असून सातासमुद्रापार पक्ष्यांचे आगमन पालघरमध्ये सुरू झाले आहे.

Team Agrowon

Vasai News : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलले असून सातासमुद्रापार पक्ष्यांचे आगमन पालघरमध्ये सुरू झाले आहे. जिल्ह्यातील निसर्गसंपन्न, हिरवेगार वातावरणही या पक्ष्यांसाठी सुखावून जाणारे ठरत आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पक्षी दिसून येत आहे. पालघरमधील नागरिकांसह पर्यटकांसाठी पक्षिदर्शनाची संधी मिळत आहे. पावसाळ्यात पालघरचे निसर्गसौंदर्य बहरले असून हिरवी शाल पांघरल्याने अधिक खुलले आहे. हिरवाईमुळे आनंद द्विगुणित होऊ लागला आहे. विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन सध्या पालघरवासीयांना व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे.

पालघरमध्ये स्थलांतरित पक्षी हे समुद्रकिनारा, नदी, पाणथळ जागा, मोकळा परिसर, खाडी किनारा, खारफुटीच्या प्रदेश, मिठागरे, जंगल, मिठागर परिसरात पक्षी दाखल झाले आहेत. पाणकोंबडी, रंगीत करकोचा, चिमण्या, पांढरे बगळे, कमळ पक्षी, खंड्या, श्वेत करकोचा, मुग्ध बलाक, राखी बगळा, तसेच सोनेरी कावळा यांसह विविध पक्षी पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

पालघर, डहाणू, वसई, नालासोपारा, विरार परिसरात पक्ष्यांचा मुक्त संचार पर्यटकांना भुरळ घालू लागला आहे. नागरिक येता-जाता त्याचे छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये टिपत आहेत. पाणकोंबडी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बावखल परिसरात त्यांचा वावर अधिक आहे.

हिरव्यागार परिसराचे आकर्षण

शहरात महापालिकेच्या वतीने केलेल्या पक्षिगणनेत १७२ प्रजाती व पाणवठ्यावर वास्तव्याला सहा हजार ९२३ पक्ष्यांची नोंद झाली होती. त्यात परदेशातील, तसेच देशभरातील पक्ष्यांचा समावेश असल्याचे व हिरवागार परिसर त्यांना आकर्षित करत आहे, हे समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये सफाळे-माकुनसार ग्रामपंचायत व सह्याद्री मित्र परिवार संस्थेने पक्षिगणनेत ५२ प्रजातींची नोंद झाली होती.

पक्ष्यांची काळजी घ्या!

सातासमुद्रापार, तसेच देशी पक्ष्यांचा अधिवास पालघरमध्ये आढळताे; मात्र काही पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यांच्यावर दगड मारले जातात; मात्र भक्ष्याच्या शोधात येणारे दुर्मिळ पक्षी हे आपल्या परिसराचे सौंदर्य खुलवत असतात. त्यामुळे त्यांचे अधिवास आणि जतन करावे. त्यांना इजा पोहोचेल, असे काही करू नये, असे आवाहन पक्षिप्रेमींतून केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kisan Samman Nidhi Hike: बिहारमधील ७३ लाख शेतकऱ्यांना मोठी भेट, वर्षाला ६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार

Rasta Roko Protest: हडसणी फाट्यावर बस थांब्याविना अपघाताचा धोका; ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन

Gopinath Munde Scheme: मृत शेतकऱ्यांच्या वारसांना १४ लाखांचे विमाकवच

Climate Changes Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात किड, रोगांचा प्रादुर्भाव कायम

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ची लांबी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT