Sugarcane Rate FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate FRP : ऊस दराबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ, राजू शेट्टी तोडगा काढण्यास तयार

Collector Office : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा बैठक पार पडली.

sandeep Shirguppe

Collector and Farmer Leaders : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा बैठक पार पडली. १३ ऑक्टेबर रोजी याबाबत पहिली बैठक घेण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बैठक बोलवली होती. या बैठकीत साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही परंतु माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील मला चर्चेसाठी फोन आला होता. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी काहीतरी मार्ग काढा असे म्हणाले.

यामुळे माझी एक पाऊल पुढे येऊन तोडगा काढण्याची तयारी आहे परंतु कारखानदारांनी चिरीमीरी दिल्यासारखा दर समोर ठेवला तर मी तोडगा काढण्यास मान्य नसल्याचे बैठकीत सांगितलं.

४०० चा आग्रह सोडतो तुमचं काय बोला?

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, माझी मागणी ४०० रुपये दुसरा हफ्ता द्या अशी आहे. हा आग्रह सोडतो तुम्ही काय मार्ग काढणार सांगा मलाही संघर्ष नको असल्याचे शेट्टी म्हणाले. तुम्ही सध्या प्रतिनीधी म्हणून आला आहे तुमच्या मालकांना मालकांना काय सांगणार सांगा. लवकरात लवकर मार्ग काढायला सांगा आणि शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे चांगले पडतील असा मार्ग काढण्यास सांगा.

साखर कारखानदारांनी योग्य तो तोडगा काढावा जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करायचे नाहीत असाही इशारा शेट्टी यांनी दिला. कारखाना रेटून चालू करायचा आणि आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा मला ऐकायला मिळत आहे असा प्रयत्न झाल्यास आमची संघटनाही जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून राज्यातील हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले, पण 'स्वाभिमानी' तत्पूर्वीच ज्याठिकाणी तोडी चालू आहेत त्या रोखणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडणे, ती पेटवणे असे मार्ग अवलंबण्यास सुरूवात केली आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानेच यात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्यातरी या तोडग्यावर निर्णय झाला नाही परंतु पुढच्या काही दिवसात ही पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी शेवटी सांगितलं

दिवाळी गोड होणार का?

मागच्या गत हगांमात प्रतिक्विंटल साखरेचा दर २९०० ते ३००० रुपयांपर्यंत होता. आता हाच दर ३८०० ते ३९०० रुपयांपुढे गेला आहे. याचा साखर कारखान्यांना निश्चितपणे फायदा होत आहे. मात्र, झालेल्या फायद्यात शेतकऱ्यांना वाटेकरू करून घेण्याची मानसिकता साखर कारखानदारांची दिसून येत नाही. आजच्या बैठकीतून शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे मिळतील आणि दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा होती परंतु अद्यापही तोडगा निघाला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT