Meena River Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मीना नदीचे पात्र पडले कोरडे

Meena River : जुन्नर तालुक्यातील वडज धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील निरगुडे व बेलसर येथील मीना नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यातील वडज धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील निरगुडे व बेलसर येथील मीना नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या परिसरातील सुराळे, बोतार्डे, आमलेवाडी, बेलसर, खानगाव, निरगुडे या गावांमधील शेतकरी हैराण झालेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे.

ऐन पावसाळ्यात मीना नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडतो. या भागात पडलेल्या पावसाचे पाणी वडज धरणात साठविले जाते. तर घंगाळदरे, भिवाडे, उच्छिल आंबोली या लघु धरणांमध्ये देखील पाण्याचा साठा केला जातो.

या पाण्यावर या भागातील निरगुडे, बेलसर, बोतार्डे, सुराळे, राळेगण, खानगाव, आदी गावांतील शेती अवलंबून आहे. सध्या नदी पात्र कोरडे झाले आहे. विहिरींनी देखील तळ गाठला आहे. उन्हाळी बाजरीचे पीक जळून चालली आहेत. तर पिण्यासाठी देखील पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.

‘समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही’

खानगावच्या हद्दीत दुसरा केटी वेयर बांधल्यास या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, मात्र या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याची खंत उपसरपंच सुभाष कामटकर यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT