Animal Diet Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Diet : उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढीचे उपाय

हिरवा आणि कोरड्या चाऱ्याच्या टंचाई काळात उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी कोणते पर्याय आहेत याविषयी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.

Team Agrowon

उन्हाळ्यात जनावरांच दूध कमी होत. कारण या काळात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन चाऱ्याची  गरज भागविली जाते. हिरवा आणि कोरड्या चाऱ्याच्या टंचाई काळात 

उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी कोणते पर्याय आहेत याविषयी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.  

हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल केला जातो. त्यामुळे जनावरांचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.रवंथ कमी झाल्याने जनावरांना अपचनासारखे आजार होतात. त्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनात घट होते.  

दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करावे?

दूध उत्पादन वाढविण्यासाठी उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे. यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ होईल. पण कधी कधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते.त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेच प्रमाण वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा. असा बदल केल्यामुळे एक ते दीड लिटरपर्यंत दूध उत्पादन वाढू शकते. जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात फॅटयुक्त पदार्थांचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात. यामध्ये तंतुमय पदार्थांचे पचन कमी होणे, कोटीपोटातील जीवजंतूना विषबाधा होणे, पचलेले अन्न शोषण्यात अडथळा येणे असे दुष्परिणाम दिसून येतात.म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो. 

जनावरांच्या आहारात ५-७ टक्क्यांपेक्षा जास्त फॅट चा वापर करू नये. जनावरांना ३० ते ४० टक्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेलबियामधून देवू नये. तेल बियांपेक्षा ४० ते ४५ टक्यांपर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य व इतर घटकातून पूर्ण करावी. त्याबरोबरच १५ ते ३० टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर आहारात करून पूर्ण करावी.  

हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याचे नियोजन 

जनावराला शरीरीक क्रिया व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जास्त उर्जा पुरवणारा आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी वापरला जातो. 

जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांनी कोरडा चारा योग्य प्रमाणात खात राहावा यासाठी त्यांना थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा. चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषक घठक म्हणजेच पशुखाद्य, पेंडी यांच प्रमाण वाढवाव. त्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषक घटक मिळत राहतील. जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा. हिरवा, वाळलेला चारा कुट्टी करुन मिसळून द्यावा. जनावरांच्या आहारात फक्त वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये. 

जनावराच्या आहारात अशा प्रकारे बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतील आणि दुधाचे उत्पादन ही वाढवता येईल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT