Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Scheme : ‘लाडक्या बहिणीं’च्या हाती रुपे कार्ड देणार ः मंत्री तटकरे

Women empowerment Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

Team Agrowon

Nashik News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा विस्तार करताना लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून ‘रुपे कार्ड’ वितरित करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी केली. \

महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी (ता. ८) जिल्हा परिषदेतर्फे महिलांसाठीच्या विविध योजनांचा तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना ई-पिंक रिक्षाचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी मंत्री तटकरे बोलत होत्या.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकासचे सहायक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील पिंक रिक्षाची सेवा विमानतळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तटकरे म्हणाल्या, की बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य काही बँकांशी शासनाने करार केले आहेत. महिलांना हे कार्ड हे क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येईल. मात्र, दारूची दुकाने व पानटपऱ्यांवर या कार्डच्या वापराला बंदी असेल. कार्यक्रमप्रसंगी लेक लाडकी योजना कार्डवाटप, स्वयंसहायता बचत गट तसेच बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आशा सेविका व कर्मचाऱ्यांना या वेळी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दिल्ली हाटच्या धर्तीवर मार्केटची निर्मिती करावी : भुजबळ

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, गोवर्धन येथील कलाग्राम महिला व बालविकास विभागाने ताब्यात घ्यावे. त्या ठिकाणचे १२५ स्टॉल्स महिला बचत गटांना उपलब्ध करून देताना दिल्ली हाटच्या धर्तीवर मार्केटची निर्मिती करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT