Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : मुहूर्ताला कमाल ३०००, तर सरासरी १६०० रुपये दर

Onion Market : उन्हाळा कांद्याला मुहूर्ताला प्रतिक्विंटल ३,००१ रुपये तर मक्याला २,३०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

Team Agrowon

Nashik News : देवळा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या निंबोळा परिसरात उपबाजार आवराची निर्मिती व्हावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून होती. तर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाने निंबोळा येथे उपबाजार आवार सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुषंगाने सोमवारी (ता. ११) उपबाजार आवाराचा प्रारंभ केला. कांदा व मक्याचे येथे लिलाव सुरू करण्यात आले. उन्हाळा कांद्याला मुहूर्ताला प्रतिक्विंटल ३,००१ रुपये तर मक्याला २,३०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

कसमादे भाग कांदा व मका उत्पादनात पुढे आहे. हीच बाजू अभ्यासून बाजार समितीने येथे शेतीमाल लिलाव सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी येथे उन्हाळ कांद्याची ७,००० क्विंटलपर्यंत आवक झाली.

कांद्याला किमान ५००, कमाल ३,००१, तर सरासरी १,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर मक्याची आवक पहिल्याच दिवशी शंभर क्विंटल झाली. त्यास सरासरी २,३०० रुपये दर मिळाल्याची माहिती सचिव माणिक निकम यांनी दिली.

लिलाव प्रारंभप्रसंगी सभापती योगेश आहेर यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, निंबोळा येथील प्रगतिशील शेतकरी जव्हार निकम यांच्या कांद्याला सर्वाधिक ३,००१ रुपये व लखमापूरच्या सोनू बच्छाव यांच्या कांद्याला २,००१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. याप्रसंगी उपसभापती अभिमन पवार, संचालक भाऊसाहेब पगार, दादाजी आहिरे, दिलीप पाटील,

माजी संचालक जितेंद्र आहेर, सरपंच प्रदीप निकम, शरद ठाकरे, सोसायटीचे उपाध्यक्ष हिरामण आहिरे, उपसरपंच नितीन निकम, पंडितराव निकम, अशोक थोरात, केदा शिरसाट, किरण पाटील, शिवाजी चव्हाण, जगदीश पवार, कैलास देवरे, संजय गायकवाड, सचिव माणिक निकम, कांदा व्यापारी, कर्मचारी, कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कैलास निकम यांनी सूत्रसंचालन केले.

निंबोळा उपबाजार आवाराच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री नव्याने स्थापन झालेल्या ठिकाणी करावी. त्यामुळे आता शेतकऱ्यांची वेळ व पैशांची बचत होईल तसेच कांदा उत्पादकांना या सुविधेचा लाभ होणार आहे.
केदा आहेर, माजी सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा
निंबोळा उपबाजारात शेतीमाल खरेदी केंद्राच्या प्रारंभात कांद्याला कमाल भाव मिळाल्याचा आनंद आहे. या उपबाजाराने शेतीमाल खरेदीत सातत्य ठेवावे व अन्य बाजार समित्यांच्या बरोबरीने सरासरी भाव देण्यासाठी आग्रही राहावे. तसेच कांदा साठवणूक शेडची उपलब्धता करून द्यावी.
जव्हार निकम, शेतकरी, निंबोळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT