Palkhi Marg Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : वेळापुरात यंदा माऊलींचा मार्ग खडतरच

Palkhi Marg : मागील दोन वर्षे येथील उड्डाणपुलाचा गुंता सुटतासुटत नाही आणि प्रशासन ऐन पालखीच्या तोंडावर कामाला लागते, हा अनुभव यावर्षीही कायम आहे.

Team Agrowon

Velapur News : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यात येत असताना वेळापुरातील पालखी महामार्गावरील कामे, उड्डाण पूल जोडणीची सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भेट देऊन अतिक्रमण काढण्यासह, उड्डाण पूल तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. नॅशनल हायवे प्रशासन ठेकेदारांना तगादा लावत असल्याने ठेकेदार ही कामे घाई गर्दीत उरकून घेण्यात गुंतले आहे. मात्र, अद्याप कामे अपूर्णच आहेत.

याबाबत ठेकेदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मागील दोन वर्षे येथील उड्डाणपुलाचा गुंता सुटतासुटत नाही आणि प्रशासन ऐन पालखीच्या तोंडावर कामाला लागते, हा अनुभव यावर्षीही कायम आहे.

वेळापूर येथील पालखीतळ पालखी महामार्ग आणि अकलूज-सांगोला रस्त्याच्या चौकाशेजारीच असून, चौकातील उड्डाणपुलाचे काम काही व्यावसायिक इमारतींच्या आणि प्रशासनाच्या विवादात अडकलेले असताना उजव्या बाजूने पंढरपूरच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड गटारीचे काम अपूर्ण ठेऊन कसाबसा चालू करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

गतवर्षी सर्व दिंड्या आणि दिंडेकरी सर्व्हिस रस्त्याने प्रचंड गर्दीतून मार्ग काढत मार्गस्थ झाले. तर पालखी चौकातून पंढरपूरच्या दिशेने भरावा करून दिंडेकरांची वाहने जुन्या बस स्थानकापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी मात्र हीच अवजड वाहने महामार्गाच्या उजव्या बाजूने पंढरपूरच्या दिशेने जातील असे प्रशासनाचे नियोजन आहे. पुण्याच्या दिशेने आलेला उड्डाणपूल पालखी चौकात जोडून पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले जाते. परंतु अद्याप या उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील काम अपूर्ण असून चिखल दलदल आणि घसरण असलेलाच आहे तर संरक्षक भिंतही त्या बाजूनी अद्याप करण्यात आलेली नाही.

वेळापुरात पालखीच्या तोंडावर प्रशासन आणि ठेकेदार जागे होतात. पालखी मार्गाच्या मूळ समस्या दरवर्षी कायम राहतात ही परिस्थिती आहे. ग्रामपंचायतने गर्दी होणाऱ्या टप्प्यात कॅनलपट्टीच्या साइड पट्टीवरील रस्ता मुरमीकरण करून पर्याय दिला आहेत.
रजनीश बनसोडे, सरपंच, वेळापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Irregularities: सडके कांदे दूर करा

Onion Procurement Irregularities: केंद्राच्या कांदा खरेदीत अधिकारी-दलालांच्या संगनमताचा आरोप

Sangli APMC: सांगली बाजार समितीच्या विभाजनावरून संचालकांत फूट

Shivsena Symbol Case: शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Agriculture Department Warns: कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना तंबी

SCROLL FOR NEXT