Vashi Kanda Batata Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mathadi Worker closed Vashi Market : वाशी 'कृषी उत्पन्न बाजार समिती'त माथाडी कामगार आक्रमक; नरेंद्र पाटलांनी बंद पाडलं मार्केट

narendra patil closed kanda batata market : नवी मुंबई महानगरपालिकने वाशी कांदा बटाटा मार्केटचे पाणी सोमवारी बंद केले. त्यामुळे मार्केटमध्ये काम करणारा माथाडी वर्ग चांगलाच आक्रमक झाला.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : वाशीच्या  'कृषी उत्पन्न बाजार समिती' मार्केटमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. येथे पाणी येत नसल्याने माथाडी कामगार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सोमवारी (ता.२४) कांदा बटाटा मार्केट बंद पाडले. तसेच पाणी बंद केल्याच्या निषेधार्त मोर्चा काढण्याचा निर्धार केला. त्यामुळे कांदा बटाटा मार्केटमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.  

वाशीच्या  'कृषी उत्पन्न बाजार समिती' मार्केटमधील कांदा बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यावरून गेल्या आठवड्यात गुरूवारी नवी मुंबई महानगरपालिकेने  'कृषी उत्पन्न बाजार समिती' कांदा बटाटा मार्केट आणि एपीएमसी प्रशासकीय इमारतीची जलवाहिनी बंद केली. त्याचा परिणाम मार्केटमधील व्यापारावर परिणाम झाला. तर  'कृषी उत्पन्न बाजार समिती' प्रशासकीय इमारतीचे पाणी देखील बंद झाल्याने त्याचा परिणाम कामकाजावर झाला.

तसेच पाणीच मिळत नसल्याने माथाडी कामगार चांगलेच आक्रमक झाले. याच प्रश्नावरून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील देखील आक्रमक झाले असून त्यांनी कांदा बटाटा मार्केट बंद करण्याचे आवाहन केले. मनपा मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला. तसेच या मोर्चात मार्केट मधील व्यापारी, कामगारांनी सहभागी व्हावे असे देखील आवाहन पाटील यांनी केले आहे. त्यानंतर  'कृषी उत्पन्न बाजार समिती' मार्केटमधील कांदा बटाटा मार्केट माथाडी कामगारांनी बंद पाडले.

तर नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली  'कृषी उत्पन्न बाजार समिती'तील सर्व माथाडी मापाडी आणि व्यापाऱ्यांनी नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला. पाटील यांच्यासह माथाडी कामगारांचा मोर्चा मनपा मुख्यालयाकडे रवाना झाला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT