Mhaisal Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Solar Project : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रारंभ २०२६ च्या सुरुवातीला होणार आहे. त्याआधी नोव्हेंबरमध्ये निविदा निघण्याची अपेक्षा आहे.

Team Agrowon

Sangli News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रारंभ २०२६ च्या सुरुवातीला होणार आहे. त्याआधी नोव्हेंबरमध्ये निविदा निघण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील साखरी येथे याआधी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची पाहणी केली.

त्या ठिकाणी तीन प्रकल्प सुरू आहेत. त्या धर्तीवर, मात्र त्याहून मोठा प्रकल्प संख (ता. जत) येथे उभारला जाणार आहे. त्यासाठी संख तलावाजवळील प्रकल्पाच्या नियोजित जागेत असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाली होती.

या प्रकल्पातून २०० मेगावॉट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. केएफसी जर्मन बँकेच्या अर्थसाह्यातून आणि केंद्र सरकारच्या निधीतून सौरऊर्जा प्रकल्प साकारला जाईल. सध्या म्हैसाळ योजनेला ९६ मेगावॉट वीज लागते. रात्रीच्या वेळी वीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे दुप्पट क्षमतेचा प्रकल्प उभारला जात आहे. पाणी आवर्तन काळ वगळता अन्य काळात ही वीज विकली जाईल. त्यातून ‘पाटबंधारे’ला उत्पन्नाचे साधन मिळेल आणि प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च निघेल.

साखरी येथे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी ‘टाटा’, ‘विप्रो’ आणि ‘मेगा’ या कंपन्यांकडून प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ‘टाटा’चा आणि ‘विप्रो’चा प्रकल्प प्रत्येकी २५ मेगावॉटचा असून ‘मेगा’चा प्रकल्प ७५ मेगावॉटचा आहे. त्यांच्या अभ्यासातून संखमधील प्रकल्पाबाबत काही गोष्टींची स्पष्टता झाली आहे.

त्याआधी येथील अंदाजपत्रक, सिव्हिल वर्कचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कर्ज मंजुरी, केंद्र व राज्य शासनाची मंजुरी या प्रक्रिया आधीच झालेल्या आहेत. जर्मन बँक आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा करारदेखील झाला आहे. निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुररू करणे बाकी आहे.

खर्च व परिणाम

सौर ऊर्जा प्रकल्प खर्च ः १ हजार कोटी

पंपहाऊस क्षमता वाढवणे ः ३५० कोटी

निर्माण होणारी वीज ः २०० मेगावॉट

प्रकल्पासाठी जमीन ः २०० हेक्टर

म्हैसाळ योजनेचे पहिला पाच टप्पे सौरऊर्जेवर चालणार

विस्तारित योजनेतील दोन टप्पेही योजनेवर चालणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Seed Law: स्वतंत्र कायदा, संरक्षणाची हमी

Tractor Tax Benefits: ट्रॅक्टरला हवी स्वतंत्र मोटारवाहन श्रेणी

Vidarbha Farmer Issues: विदर्भातील आर्णी तालुक्यात १४ महिन्यांत ४७ आत्महत्या

Saline Soil Farming Success: खारपाणपट्ट्यावर फुलू शकेल हिरवाई

Matru Vandana Scheme: मातृत्व वंदना योजनेला पुन्हा गती

SCROLL FOR NEXT