Market Update Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : टोमॅटोचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, ज्वारी आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे भाव कालच्या तुलनेत आज काहीसे वाढले होते. वायदे आज दुपारपर्यंत ९.९६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१९ डाॅलरवर होते. पण देशात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावातही चढ उतार सुरुच आहेत. कापसाच्या वायद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही काहिशी सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७२.७१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५६ हजार ९१० रुपये प्रतिखंडीवर होता. कच्च्या कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या दरात चढ उतार

टोमॅटोची बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चांगली वाढ झाली होती. मात्र वाढलेल्या भावात मागणीवर काहिसा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. मात्र टोमॅटोचे वाढलेले सरासरी भाव कायम आहेत. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला.

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT