Flower Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : दर्जेदार झेंडूसाठी गुणवत्तापूर्ण रोप निवडीवर भर

Marigold Flower Production : सांगली जिल्ह्यातील समडोळी (ता. मिरज) येथे राहुल जाधव यांची ४ एकर शेती आहे. त्यात मुख्य पीक म्हणून ऊस लागवड केली जाते.

Team Agrowon

Marigold Flower Farming : शेतकरी नियोजन ः झेंडू

शेतकरी ः राहुल बाळासो जाधव
गाव ः समडोळी, ता. मिरज. जि. सांगली.
एकूण शेती ः ४ एकर (संपूर्ण ऊस)
झेंडू लागवड ः तीन एकर (करार पद्धतीने)

सांगली जिल्ह्यातील समडोळी (ता. मिरज) येथे राहुल जाधव यांची ४ एकर शेती आहे. त्यात मुख्य पीक म्हणून ऊस लागवड केली जाते. राहुल यांनी कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सुरुवातीपासून फुलशेतीची आवड होती. त्यामुळे त्यांनी झेंडू लागवड करण्याचा निर्णय घेतला. मागील नऊ वर्षांपासून ते झेंडू लागवड करत आहेत. घरच्या संपूर्ण शेतीमध्ये ऊस लागवड असल्याने करार पद्धतीने जमीन घेऊन त्यात झेंडू लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली.

त्यासाठी सुरुवातीला दोन एकर शेती करार पद्धतीने घेतली. पुडे त्यात वाढ करून सध्या तीन एकरांवरील झेंडू लागवडीतून ते उत्पादन घेत आहेत. कृषीमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग ऊस आणि फूल शेती राहुल करत आहेत. बारमाही झेंडू उत्पादन घेतले जाते. त्यासाठी जानेवारी (उन्हाळी), मे (पावसाळी) आणि नोव्हेंबर (हिवाळी) असे तीन लागवडीचे हंगाम निश्चित केले आहेत. त्यानुसार काटेकोर नियोजन करून दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दर्जेदार उत्पादनासाठी रोपवाटिकेतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तयार रोपांची खरेदी केली जाते.

लागवडीची तयारी ः
- झेंडू लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केली जाते. त्यासाठी रोपांची आगाऊ मागणी नोंदवली जाते. लागवडीसाठी कलकत्ता या जातीची झेंडू रोपे मागणीनुसार तयार करून घेतली जातात.
- लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत केली जाते. जमिनीची खोलवर नांगरट करून रोटर मारला जातो.
- लागवडीसाठी चार फुटांचे बेड तयार केले जातात.


- सिंचनासाठी बेडवर ठिबकच्या नळ्या टाकून घेतल्या जातात.
- बेड तयार केल्यानंतर ठिबकद्वारे बेड चांगले भिजवून घेतले जातात. साधारण २ दिवस बेड भिजवले जातात.
- बेडवर मल्चिंग पेपर अंथरून घेतला जातो.
- दोन रोपांमध्ये साधारण एक फूट अंतर राखत १७ सप्टेंबर रोजी लागवड केली आहे.
- लागवडीसाठी एकरी साधारण नऊ हजार रोपांची आवश्यकता भासते.

खत व्यवस्थापन ः
- फुलांच्या दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रत्येक टप्प्यावर खतांच्या योग्य मात्रा दिल्या जातात.
- सहाव्या दिवशी १९ः१९ः१९, ह्युमिक ॲसिडचा ठिबकद्वारे वापर केला जातो. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
- फुटवे चांगले येण्यासाठी दहाव्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट, १२ः६१ः०० यांचा ठिबकद्वारे वापर केला जातो.


- अपेक्षित वाढ मिळवण्यासाठी साधारण १९ व्या दिवशी कळी खुडली जाते. तसेच अपेक्षित फूल उत्पादन मिळण्यास मदत होते.
- २० व्या दिवशी १३ः४०ः१३ या रासायनिक खतांचा ठिबकद्वारे वापर केला. त्यामुळे फुटवे चांगले येण्यासाठी वापर केला जातो.
- ४५ व्या दिवशी ०ः५२ः३४ आणि बोरॉनचा वापर.

कीड-रोग व्यवस्थापन ः
- हवामान बदलानुसार पिकावर नागअळी, करपा इत्यादी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर ८ दिवसांनी रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.
- रोपांची लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बुरशीनाशकांची आळवणी केली जाते.
- वाढीच्या काळात पिकाचे सातत्याने निरिक्षण केले जाते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आवश्यकतेनुसार रासायनिक
फवारणीचे नियोजन केले जाते.

सिंचन नियोजन ः
- सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
- लागवड केल्यानंतर एक दिवसाआड प्रमाणे एक तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
- हंगामामध्ये फुलांचे उत्पादन सुरु झाल्यानंतर एक दिवसाआड तीन तास ठिबकने सिंचन करण्याचे नियोजन असते.
- तापमानातील चढ-उतारानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जातो.

उत्पादन, विक्री ः
- लागवडीनंतर साधारण ४५ दिवसांनी फुले तोडणीस येतात.
- मागील महिन्यात ३१ऑक्टोबरला पहिला तोडा घेतला. त्यातून साधारण ५०० किलो फुलांचे उत्पादन मिळाले.
- दुसरा तोडा ४ नोव्हेंबरला केला. त्यातून साधारण ६५० ते ७०० किलो फुलांचे उत्पादन मिळाले आहे.
- सध्या बाजारात १२ ते १५ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळतो आहे.
- दरवर्षी सरासरी ८ ते ९ टन झेंडू फुलांचे उत्पादन मिळते. त्यास सरासरी ३० रुपये प्रति किलोस दर मिळतो.
- उत्पादित सर्व फुलांची विक्री मुंबई येथील दादर फुलमार्केट केली जाते.

राहुल जाधव, ७६६६८५१५१७
(शब्दांकन ः अभिजित डाके)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT