Vidhansabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election : निवडणुकीमुळे ग्रामीण भागात अनेकांना मिळाला रोजगार

Buldana Vidhansabha Election : मात्र शेतीकामासाठी मिळेनात मजूर

Team Agrowon

Buldana News : नांदुरा, जि. बुलडाणा : निवडणुकीच्या रणधुमाळीत दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होत असून हजारो हातांना काम मिळाले आहे. मंडप व्यावसायिकांसह ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, डिझायनर, बॅनर, प्रिंटर्स, स्टीकर, फ्रेममेकर्स, पत्रके, झेंडे बनवणारे त्याचबरोबर झेरॉक्स मशिन चालकांसह लहान मोठ्या व्यवसायिकांना रोजगार मिळाला आहे.

दरम्यान सध्या शेतीकामास मजुरांची प्रचंड वानवा झाली आहे. महिनाभरापासून सुरू असलेला दिवाळीचे वातावरण आता कमी होऊ लागले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीचे फटाके फुटत आहेत. सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे.

छोट्या छोट्या घटकातील लोकांना एकीकडे रोजगार मिळत असला तरी दुसरीकडे रोज काबाडकष्ट करणारे मजूर आता मजुरी करताना दिसत नाहीत. शेतीच्या कामांसाठी मिळत नसल्याची वस्तुस्थिती सध्या दिसून येत आहे.

हॉटेल, खानावळी हाऊसफुल झाल्याचे रोज बघायला मिळते. मंडप, खुर्ची व साउंड सिस्टिम वाल्यांना निवडणुकीमुळे मोठी मागणी आल्याने त्यांची आर्थिक उलाढाल वाढलेली आहे. आपल्या नेत्यांचे स्वागत व गावखेड्यात आगमन होतास त्यांच्या स्वागतासाठी लागणारे फेटे, हार, बुकेसुद्धा भाव खात आहेत.

जेवणावळीला तुफान गर्दी

सध्या निवडणूक असल्याने दुपारी व संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणच्या हॉटेल, ढाब्यावर तोबा गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी अचानक झाल्याने जेवणावळीवाले देखील कमी पडू लागल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT