Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Crop Damage in Khandesh: खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेर शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. केवायसीअभावीची प्रक्रिया पूर्ण करा व अनुदानाचा लाभ घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेर शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. केवायसीअभावीची प्रक्रिया पूर्ण करा व अनुदानाचा लाभ घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपोटी प्राप्त झालेली २९९ कोटी रुपये नुकसान भरपाई केवायसीअभावी शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. सुमारे दोन हजारांवर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसल्याची माहिती आहे.

यामुळे प्रशासन हे अनुदान संबंधित लाभार्थींना देऊ शकत नाही. केवायसीची प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने अनेकदा केले आहे. ई-केवायसी न केल्यास लाभाची रक्कम किंवा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याची स्थिती आहे.

या कामासाठी संबंधित तालुका कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही २०२२ मध्ये काही भागांत अतिवृष्टी किंवा अधिक पाऊस झाला होता. त्यात घरगोठ्यांसह शेतीची हानी झाली होती.

या भागातही सुमारे अडीच हजारांवर शेतकऱ्यांना केवायसीअभावी नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकलेली नसल्याची माहिती मिळाली. अनेक शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे केवायसी प्रक्रियेत येत नाहीत. यामुळे अडचण येत आहे.

काही शेतकऱ्यांनी आधार अपडेट केलेले नाही, याचाही फटका बसला आहे. वृद्ध, सतत शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना बोटांचे ठसे व अन्य बाबींत अडचणी आल्याची माहिती आहे. यात आधार अपडेट करण्यासाठी गेल्यास आधार केंद्रात दोन ते तीन तास थांबावे लागते.

मोठी गर्दी तेथे असते, यामुळे वृद्ध, रूग्ण शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची माहिती मिळाली. मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२ मध्ये मोठी हानी झाली. दोन लाख ६३ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

त्यात चाळीसगाव, मुक्ताईनगर व पाराळो तालुक्यांत अधिकची हानी झाली. या हानीसंबंधी प्रशासनाने पंचनामे केले व भरपाईसाठी अहवाल पाठविला होता. यासंबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमही शासनाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT