ST Bus  Agrowon
ॲग्रो विशेष

Free ST Pass : मोफत एसटी पाससाठी विद्यार्थिनींची वणवण

ST Mahamandal : शासनाने माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत योजना लागू केली आहे.

Team Agrowon

Jalagaon News : शासनाने माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत योजना लागू केली आहे. परंतु हा मोफत पास जळगावच्या एसटी आगारातून मिळविताना अनेक अडचणी, चुकीच्या फतव्यांचा अडथळा पार करावा लागत आहे.

या आगारात त्यासंबंधी विद्यार्थिनींची अडवणूक केली जात असल्याचाही प्रकार सुरू आहे. मोफत एसटी पाससंबंधी एसटी आगारासह शाळाही सहकार्य करीत नाहीत. यामुळे शेकडो विद्यार्थिनीं या पास सवलत योजनेपासून वंचित आहेत. २०२३-२४ मध्ये शाळांचे पहिले सत्र सुरू होतानाच म्हणजेच जूनमध्ये शाळांकडून आपल्या विद्यालयातील मोफत एसटी पास सवलत योजनेसाठी पात्र विद्यार्थिनींची यादी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे पत्र पाठविण्यात आले.

यानंतर संबंधित विद्यार्थिनींचा वर्ग व इतर माहिती नमूद करून या पास सवलतीचा लाभ विद्यार्थिनींना दिला जावा, असे स्वतंत्र पत्रही जळगावच्या एसटी आगाराला देण्यात आले. यानंतर या योजनेतून त्रैमासिक मोफत पास ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना देण्यात आली. ही पास देतानाच सर्व कागदपत्र, शेरे एसटी आगाराने शाळांकडून घेतले होते.

या पासचे नूतनीकरण दर तीन महिन्यांनी करताना पुन्हा शाळेचे पत्र, एसटी पास योजनेसाठी संबंधित विद्यार्थिनी पात्र असल्याची यादी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे पत्र जळगाव येथील एसटी आगार किंवा संबंधित प्रशासन विभागाकडून मागितले जात आहे. ही कादगपत्रे न दिल्यास पास मिळणार नाही, असे एसटीचे आगारप्रमुख व संबंधित विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांना सांगत आहेत.

ही कागदपत्रे विद्यार्थिनी पुन्हा कशी मिळवतील, असा मुद्दा आहे. एकदा पत्र, यादी व शिक्षण विभागाचे पत्र एसटी आगाराला संबधित शैक्षणिक वर्षासाठी दिल्यानंतर ते पुन्हा एसटीच्या जळगाव आगारातून किंवा संबंधितांकडून का मागितली जात आहेत, असाही प्रश्‍न विद्यार्थिनी, पालकांनी उपस्थित केला आहे.

हा प्रकार म्हणजेच अडवणुकीचा असून, शासकीय योजनांचा लाभ मिळू न देण्यासाठीच जणू जळगावचा एसटी विभाग काम करीत असल्याची तक्रारही पालक करीत आहेत. अनेक विद्यार्थिनी पास मिळत नसल्याने पदरचे भाडे खर्च करून एसटीतून प्रवास करीत आहेत. यामुळे योजनाचा उपयोगच काय, तिचे उद्दिष्टच यशस्वी होत नसल्याची नाराजीही पालक व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT