Maratha Reservation agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी हो किंवा नाही सांगावं अन्यथा...; जरांगे -पाटील यांचा इशारा

CM Devendra Fadnavis : मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांआमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी २ शब्दांत आपली भूमिका सांगायला हवी".

sandeep Shirguppe

Maratha Arkshan Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने चेहरा पूर्णपणे सुकलेला आहे, अंगात त्राण नाही, त्यांना बोलताना त्रास होत आहे. तरीही जरांगे -पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच अवस्थेत त्यांनी उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे.

जरांगे -पाटील म्हणाले की, "आमच्या ज्या सात - आठ मागण्या आहेत, त्या मान्य करायच्या आहेत की नाहीत, त्यांची अंमलबजावणी करायची आहे की नाही याबाबत स्पष्टपणे सांगावे. तु्म्ही अंमलबजावणी करणार नसाल तर आम्हाला वेगळ्या मार्गानं आंदोलन करावं लागेल". अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

"सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. आज ५ दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही. आरक्षण देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. किंबहुना मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांआमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी २ शब्दांत आपली भूमिका सांगायला हवी". असे जरांगे म्हणाले.

"आमच्या आठ ते नऊ मागण्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत की नाहीत. हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण अनेक लोक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. आमच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करावं लागेल, असा इशारा यावेळी जरांगेंनी दिला.नी एक तर हो किंवा नाही म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल". असा इशारा दिला आहे.

उपोषणाला बसावं लागेल वाटलं नव्हतं

आम्हाला उपोषणाला पुन्हा बसावं लागेल किंवा अशी वेळ पुन्हा येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. मला यावर आता जास्त काही बोलायचं नाही. अंमलबजावणी करणार की नाही? हो किंवा नाही फक्त एवढंच मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. तुमची भूमिका एक-दोन तासांत स्पष्ट करावी, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. दरम्यान, उपोषणस्थळावरून जरांगेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Farming Success: दुष्काळी पट्ट्यात संघर्षातून यशस्वी केल्या फळबागा

Grape Farming Success Story: देश, परदेशातील मार्केटनुसार विविध वाणांची द्राक्षशेती

MSEDCL Worker Safety: ‘राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्न राबवा’

IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र

Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

SCROLL FOR NEXT