Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरू

Maratha Reservation Protest: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे पाटील यांचा दीड वर्षापासून लढा सुरू आहे. पुन्हा एकदा आरक्षणासाठी शनिवारी (ता.२५) अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे श्री. जरांगे पाटील यांनी गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरात दर्शन घेऊन आपले सातवे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Jalna News: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे पाटील यांचा दीड वर्षापासून लढा सुरू आहे. पुन्हा एकदा आरक्षणासाठी शनिवारी (ता.२५) अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे श्री. जरांगे पाटील यांनी गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरात दर्शन घेऊन आपले सातवे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या वेळी श्री. जरांगे पाटील म्हणाले, की या ठिकाणी दीड वर्षापासून आरक्षण लढा सुरू आहे. शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, राज्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे वापस घ्यावेत.

सातारा, हैदराबाद, बॉम्बेचे गॅजेट लागू करावे आदी मागण्यांसाठी उपोषण करीत आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही मागणीही या वेळी श्री. जरांगे यांनी केली आहे. या ठिकाणी जे आंदोलन, उपोषण सुरू आहे,

त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आरक्षणसाठी मदत झाली. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांचे बहुमत आहे. सत्ता आहे.

आता त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. ते आरक्षण देतील अशी अपेक्षा श्री. जरांगे यांनी व्यक्त केली. अंतरवाली सराटी येथे श्री. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी रात्रीपासून नागरिक, महिलांनी गर्दी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT