Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : 'या गुलालाची लाज राखा, अध्यादेशाला धक्का लागला तर...'; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जी लढाई सुरू केली होती. त्यास आज शनिवारी (दि २७ रोजी) पुर्ण झाल्या आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत जाण्याआधीच त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचे राजपत्रक काढले. ते शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या हाती दिले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जी लढाई सुरू केली होती. त्यास आज शनिवारी (दि २७ रोजी) पुर्ण झाल्या आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत जाण्याआधीच त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचे राजपत्रक काढले. ते शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या हाती दिले. त्यामुळे मनोज जरांगे यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी विजयी सभा झाली. यात मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. तसेच आपण केलेल्या मागण्या सरकारने पुर्ण कराव्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या गुलालाची लाज सरकारने राखावी असे म्हटलं आहे.

मराठा समाजाचे लाखो लोक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघाले होते. ते मुंबईच्या वेशीवर पोहचले होते. तर आता मुंबईत हे भगवे वादळे धडकणार यांच्याआधीच सरकारने सर्व मागण्या मान्य झाल्याचा अध्यादेश काढला. यामुळे मनोज जरांगे यांनी आपण मुंबईत जाणार नसल्याचं जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडून ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाणार असल्याचे घोषित करत तेथे विजयी सभा घेण्यात येईल असे घोषणा केली.

यावेळी मनोज जरांगेंनी, मुख्यमंत्री शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगे सोयऱ्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, त्याची लाज राखा. तसेच जो गुलाल उधळलाय, जो तुम्ही लावलाय त्याचा अपमान होऊ देऊ नका. ज्यांच्या कुणबी नोंद सापडल्या आहेत. त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. तर मराठवाड्यात खूप कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. १८८४ चे जे गॅजेट सापडले आहेत. ते शिंदे समितीकडे देऊन शिंदे समितीला वर्षभराची मुदत द्या. त्यांना वर्षभर काम करु द्या, अशी मागणी केली आहे.

तसेच, पुढे बोलताना, ५४ लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आणि त्यांच्या परिवारातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी. तर या आरक्षणासाठी समाजाने आणि मी खूप संघर्ष केला आहे. पण जर या अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर लढायला मी पुढे असणार आहे असा इशारा देखील दिला आहे.

ओबीसीचा सवलती दिल्या जातील : मुख्यमंत्री शिंदे

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगेंचं कौतुक केले. तसेच, मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात शांततेनं, संयमानं समाजाने आंदोलन यशस्वी केल्याने सर्वांचे आभार मानले. तसेच पुढे ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. आरक्षणासाठी जे निर्णय घेतले आहेत, ते मान्य केले जातील. प्रमाणपत्र वाटपासाठी शिबीर लावली जात आहेत. मात्र कुणावरही अनन्या केला जाणार नाही. मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. मराठ्यांना ओबीसीच्या सवलती देखील दिल्या जातील असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं आणि दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. तर न्याय मागताना, आपला हक्क मागताना मराठा समाजानं कोणालाही त्रास होऊ दिला नाही. हा क्षण मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक असा आहे, असेही ते म्हणालेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT