Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Storage : मांजरा, निम्न तेरणा धरणाची नव्वदी पार

Team Agrowon

Latur News : लातूर : परतीच्या पावसानेही हातभार थोडा हातभार लावल्याने लातूर, बीड व धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या धनेगाव (जि. बीड) येथील मांजरा धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. लातूर व धाराशिवसाठी महत्त्वाच्या असलेल्या माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पातही मंगळवारी (ता. २५) सकाळी सहा वाजता ८९.३८ टक्के पाणी आले होते. सायंकाळपर्यंत या धरणातील पाणीसाठाही नव्वदी गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यातील लहान व मोठ्या १४४ प्रकल्पांत ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आल्याने पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाच्या पाण्याचीही समस्या मिटली आहे.

यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस झाला. याचा परिणाम लहानमोठ्या धरणात पाणी आले. त्यानंतर जमिनीतून पाणी बाहेर पडून नदी व नाले वाहते झाले. नियमित पाऊस पडल्यामुळे नदी व नाल्यांतील पाणी कमी झाले नाही. त्यामुळे लहान मोठ्या प्रकल्पात जुलैपासूनच पाणी येण्यास सुरुवात झाली. नेहमीच परतीच्या पावसाने भरणाऱ्या मांजरा धरणातील उपयुक्त साठ्यात यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाणी येण्यास सुरुवात झाली.

यातूनच दोनच महिन्यांत धरणातील साठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून लवकरच धरण शंभर टक्के भरून दरवाजे उघडण्याची वेळ येणार आहे. सध्या धरणात पाण्याची आवक वाढल्याची माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली. निम्न तेरणा प्रकल्पातही पाण्याची आवक सुरूच असून हे धरणही लवकरच भरण्याची शक्यता शाखा अभियंता के. आर. येणगे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच लहानमोठे प्रकल्प व प्रकल्पांच्या उपयुक्त साठ्यात पाणी आले असून प्रकल्पांतील उपयुक्त साठ्यात ८३ टक्के तर उच्चस्तरीय बंधाऱ्यात ७९ टक्के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

Nuksan Bharpai : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५४८ कोटींवर निधीची गरज

Land Dispute : कोट्यवधींच्या सरकारी जमिनीची परस्‍पर विक्री

Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

SCROLL FOR NEXT