Mango and Cashew Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Update : आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनात

Mango and Cashew Tree : तिसऱ्या टप्प्यातील आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत. आंब्यावर काळे डाग तर काजूचा मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : तिसऱ्या टप्प्यातील आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत. आंब्यावर काळे डाग तर काजूचा मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात आंबा, काजूचा हंगाम सध्या सुरू आहे. आंब्याला दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील तीन टप्प्यांत मोहर आला. दुसऱ्या टप्प्यातील मोहर फुलकिडीच्या विळख्यात सापडला, तर तिसऱ्या टप्प्यातील मोहराला लागलेल्या फळांना आता उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत.

फळगळ आणि फळांवर काळे डागदेखील काही ठिकाणी पडू लागले आहेत. काजूला पहिल्यांदाच या वर्षी तीन टप्प्यांत मोहर आला. नोव्हेंबरमध्ये काही झाडांना मोहर आला. त्यानंतर डिसेंबर आणि अखेरचा मोहर अलीकडे मार्चमध्ये आला.

तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर आता कडक उन्हामुळे काळा पडू लागला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात किरकोळ स्वरूपात काजू उत्पादन आले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील काजू उत्पादन शेतकऱ्यांना तारेल अशी अपेक्षा होती. परंतु मोहरच काळा पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

या वर्षी काजू उत्पादन ३० टक्केच येण्याचा अंदाज आहे. काजूचे उत्पादन यावर्षी ३० टक्केच येण्याचा अंदाज आहे. एप्रिल उजाडला तरी अजूनही बाजारपेठेत अपेक्षित काजू बीची आवक झालेली नाही. तरीही दरात सुधारणा झालेली नाही. व्यापारी ११० रुपयांनीच खरेदी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT