Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मालपे, पोंभुर्लेला पावसाने झोडपले

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालपे आणि पोंभुर्लेला पावसाने शनिवारी (ता. २०) पहाटे झोडपून काढले. याशिवाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह सरी कोसळल्या आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालपे आणि पोंभुर्लेला पावसाने शनिवारी (ता. २०) पहाटे झोडपून काढले. याशिवाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह सरी कोसळल्या आहेत. पावसाचे वातावरण कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागांवरील संकट अधिक गडद झाले आहे.

जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचे वातावरण आहे. बुधवारी (ता. १७) रात्री उशिरा जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर शुक्रवारी (ता. १९) दिवसभर पावसाचे वातावरण होते. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून जिल्ह्यात विजांचा गडगडाट सुरू झाला. देवगड तालुक्यातील मालपे, पोंभुर्ले या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसाच्या सरीवर सरी या भागात कोसळल्या. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता.

दरम्यान, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वैभववाडी यासह विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गेले चार-पाच दिवस असलेले ढगाळ वातावरण, सध्या पडत असलेला पाऊस आणि पुढील दोन, तीन दिवस पावसाची शक्यता, यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागा संकटात सापडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आंबा हंगाम सुरू आहे. वातावरणाचा मोठा परिणाम आंबा हंगामावर होणार आहे. त्यामुळे बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे.

तीन दिवस पावसाचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विजांच्या लखलखाटांसह पाऊस आणि ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yashwant Factory Land Deal: ‘यशवंत’ जागा विक्री गैरव्यवहार प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Jowar Production: ज्वारीच्या पेरण्यांना पावसाचा फटका; उत्पादन घटीची भीती

Robotics International 2025: जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जाणार रोबोटिक्स स्पर्धेला

Leopard Threat: साखर आयुक्तालयाच्या ‘बिबट’संबंधी उपाय कागदावरच

Sugarcane Rate Protest: ऊसदर प्रश्नावर सोमवारी माजलगाव येथे ‘चक्काजाम’

SCROLL FOR NEXT