Malegaon Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Factory: माळेगाव’चे ऊस उपलब्धतेत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न सुरू

Smart Farming Technology: माळेगाव (ता. बारामती) साखर कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रशिक्षण शिबिरातून या प्रयोगाला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News: बारामती तालुक्यातील माळेगाव कारखाना प्रशासनाला आता ऊस उपलब्धतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने एकरी ऊस उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान कारखाना कार्यक्षेत्रात राबविण्याचा निर्धार केला आहे.

त्यानुसार बुधवारी (ता. ९) माळेगाव कारखान्याने कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके-बारामती) मदतीने आयोजित केलेल्या एआय तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासन साखर, वीज, इथेनॉल, खते निर्मितीमध्ये आजवर उजवे ठरले आहे. परिणामी या कारखान्याचे प्रशासन शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी ऊस दर देण्यात यशस्वी ठरले आहे. अर्थात प्रगतीची ही यशस्वी घोडदौड यापुढेही कायम राहण्यासाठी प्रशासनाने आतापासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्या पार्श्वभूमिवर माळेगावच्या प्रशासनाने एआय तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण शिबिराला महत्त्व प्राप्त झाले होते.

माळेगावच्या कार्यक्षेत्रात १५ टक्केपेक्षा कमी ठिबक सिंचन प्रणाली आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञान अधिक गतीने वापरणे शक्य होण्यासाठी प्रथम ठिबक प्रणाली बनविण्यासाठी काम करावे लागेल, असे ‘केव्हीके’चे विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र ) डॉ. विवेक भोईटे यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी म्याप मायक्रॉपचे संचालक डॉ. भूषण गोसावी, एआय तज्ज्ञ संतोष जाधव, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी मार्गदर्शन केले. ‘माळेगाव’चे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी देवकाते, अनिल तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, दत्तात्रेय येळे, मंगेश जगताप, स्वप्निल जगताप, बन्शीलाल आटोळे, सागर जाधव, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT