Malegaon Sugar
Malegaon Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Diwali Bonus : माळेगाव कारखाना दिवाळीला देणार एकरकमी ३६० रुपये

Team Agrowon

Baramati News : माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत सभासदांना प्रतिटन एकरकमी ३६० रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच कामगारांना २१ टक्के बोनस देण्याचे प्रशासनाने जाहीर केले. बोनसमध्ये दिवाळीला १६ टक्के, तर संक्रात सणाला ५ टक्के अशी बोनसची वाटणी प्रशासनाने केली आहे. विशेषतः रोजंदारी कामगारांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे.

माळेगावच्या प्रशासनाला वरील ऊसदेणी देण्यासाठी सुमारे ३५ कोटींची तरतूद करावी लागणार आहे, तसेच कामगार बोनस देण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्या आधिपत्याखाली सोमवारी (ता. ३०) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. गतवर्षीच्या अंतिम दरातील रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांना प्रतिटन एकरकमी ३६० रुपये देण्याचा निर्णय झाला.

तसेच कामगारांना २१ टक्क्यांपैकी दिवाळीला १६ टक्के बोनस देण्याचे प्रशासनाने जाहीर केले. दरम्यान, माळेगावच्या संचालक मंडळाने ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२२-२३ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम दर ३४११ रुपये प्रतिटन इतका जाहीर केला होता.

त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा ५६१ रुपये अधिक मिळणार आहेत, गेटकेनधारक शेतकऱ्यांना ३१०१ रुपये प्रमाणे अंतिम ऊस बिल अदा होणार आहे. सध्या एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात माळेगाव कारखाना राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. माळेगावची एफआरपी २८५१ प्रतिटन असून आत्तापर्यंत सभासदांना एफआरपी व १०० रुपये कांडेपमेंटसह २९५१ रुपये दिले आहेत.

आता उर्वरित प्रतिटन ४६० रुपये इतकी समाधानकारक रक्कम आगामी काळात सभासदांना मिळणार आहे. सध्याला प्रतिटन १०० कपात करीत प्रशासन सभासदांना दिवाळीला ३६० रुपये एकरकमी देणार आहे. गेटकेनधारकांना याआगोदर दिलेली २८५१ रुपये वगळता उर्वरित २४९ रुपये मिळणार आहे.

अध्यक्षांचे उसाबाबत आवाहन

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा उत्तम कारभार झाल्याने चांगला दर देऊ शकलो. विशेषतः अजित पवारांचे मार्गदर्शन आणि दैनंदिन खर्चातील काटकसरीमुळे हे शक्य होत आहे.

आगामी काळातही चांगला दर देणार असून शेतकऱ्यांनी ऊस देताना माळेगावला पसंती द्यावी, असे आवाहन माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील आदी संचालक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate : आठ दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा अन्न त्याग आंदोलन करणार; दूध उत्पादक कृती समितीचा इशारा

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत पावणेदोन लाख शेतकऱ्यांचा सहभाग

Agriculture Sowing : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

Sugar Industries : साखर उद्योग, कर्जाचा डोंगर, कारखाने अडचणीत; हमीभाव वाढला तरच तोटा कमी होण्याची ‘हमी’

Agriculture Crop Loan : राष्ट्रीयकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखडता

SCROLL FOR NEXT