Crop Survey Statement Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey : चक्रीवादळ व पूर्वमोसमी पाऊस नुकसानीचे पंचनामे करा

Crop Survey Statement : नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसकट मदत दिली जावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली. याबाबत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन देण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : या उपविभागात रविवारी (ता.२६) आलेल्या चक्रीवादळ व पूर्वमोसमी पावसामुळे काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसकट मदत दिली जावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली. याबाबत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले, की जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चक्रीवादळ व पूर्वमोसमी पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेतीपिकांचे व व्यावसायिकांचे, नागरिकांचे नुकसान झाले.

अनेकांच्या राहत्या घरांवरील टिनपत्रे उडून गेले. वीज पडून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत मिळावी असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ॲड.ज्योती ढोकणे, जिल्हा सरचिटणीस ॲड अमर पाचपोर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप यांच्यासह इतर उपस्थित होते.

मागण्या

जीवितहानी झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला विलंब न करता भरीव अशी आर्थिक मदत देण्यात यावी

शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करावेत

छोट्या मोठ्या व्यापारी व व्यवसायिकांना दिलासा म्हणून तत्काळ पंचनामे व्हावेत

जनावरांच्या गोठ्याचे सद्धा प्रचंड नुकसान झालेले असून काही जनावरे जखमी झालेली आहेत, अशा पशुपालकांना सुद्धा तत्काळ मदत द्यावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; सकाळी थंडी वाढली तरी दुपारी उन्हाचा चटका कायम

Sangli Rain: सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत १०९ टक्के पाऊस

Pigeon Pea Farming: तूर पिकात दाणे होताहेत पक्व; फवारणीच्या कामाला वेग

Water Reservation: अकोला जिल्ह्यासाठी पाण्याचे ९०.३४ दलघमी आरक्षण मंजूर

ICAR Wheat DBW : आयसीएआरने विकसित केलेल्या गव्हाच्या सहा वाणांवर पंजाब कृषी विद्यापीठाचा आक्षेप; आयसीएआरचा दावा काय?

SCROLL FOR NEXT