Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

Crop Survey Demand : नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत,’’ अशा सूचना आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Team Agrowon

Shirur News : ‘‘शिरूर तालुक्यात वादळी वारा व गारांसह पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत,’’ अशा सूचना आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

शिरूरच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, तांदळी, इनामगाव, पिंपळसुटी परिसरांत डाळिंब, केळी, ऊस व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घर व पोल्ट्री शेडवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मांडवगण फराटा येथील नुकसानग्रस्त शेतीची आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी पाहणी केली. त्यावेळी पवार बोलत होते. घोडगंगा कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, दत्तात्रेय फराटे, शंकर फराटे, रावसाहेब जगताप, मारुती घाडगे, राजेंद्र जगताप, सुनील जगताप या वेळी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्यात अनेक गावांत पावसामुळे डाळिंब, ऊस, केळी, पोल्ट्री पत्राशेड व घरांचे नुकसान झाले. निवडणुकीच्या कामकाजामुळे प्रशासकीय अधिकारी सध्या व्यग्र असले तरीही येत्या दोन दिवसांत महसूल प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत. तोडणीस आलेले अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब गळून पडले आहेत.

डाळिंब पिकातील क्रॉपकव्हर देखील फाटले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करून दिलासा द्यावा. वळवाच्या अचानक झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT