Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : कांदा लागवडीत खानदेशात मोठी घट

Rabi Season : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बीतील कांदा लागवडीत मोठी घट झाली आहे. ही लागवड सुमारे चार हजार हेक्टरने कमी झाली असून, सुमारे आठ हजार हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बीतील कांदा लागवडीत मोठी घट झाली आहे. ही लागवड सुमारे चार हजार हेक्टरने कमी झाली असून, सुमारे आठ हजार हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती आहे.

धुळे जिल्ह्यातील लागवडीत मोठी घट झाली आहे. धुळ्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कांदा लागवड केली जात होती. परंतु यंदा तेथे लागवडीत ३५ ते ४० टक्के घट झाली आहे. धुळे, साक्री व शिंदखेडा तालुक्यास दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसला असून, या भागात शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. तर काही शेतकऱ्यांनी लागवडही टाळली आहे.

कांदा रोपवाटिका निर्मिती ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्यासाठी केली जाते. या काळात कांद्याच्या दरात चढउतार सुरू झाले. नंतर कांदा दरात वाढ झाली व लागलीच दर पडले. या अस्थिर स्थितीमुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवड टाळली. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. पिकाची स्थिती बरी आहे. परंतु त्यास आता उष्णता वाढल्याने सिंचनासाठी पाण्याची अधिकची गरज पडू लागली आहे. धुळ्यातील लागवड सुमारे पावणेतीन हजार हेक्टरवर झाली आहे.

कांदा दरात वाढ झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी लागवड कायम ठेवली. परंतु जशी कांदा दरात घसरण व निवडणुकीसंबंधी चर्चा सुरू झाली, तशी लागवडीतही घट झाली. कांदा दरात घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना साठविलेला कांदा बाजारात आणावा लागला. नव्या कांद्यासही लागलीच बाजारात आणले जात होते. दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

नंदुरबारातही लागवड कमी

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात लागवडीत मोठी घट झाली आहे. तसेच शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यातही कांदा लागवड कमी आहे. कांदा पिकाऐवजी अनेकांनी हरभरा, ज्वारी या पिकांना प्राधान्य दिले आहे. कारण हरभरा पिकात नफा अधिक व खर्च कमी आहे. तसेच पाण्याची गरज अल्प आहे. कांद्याचा एकरी खर्च लागवडीपासून ते काढणीपर्यंत २५ हजार रुपयांवर आहे. या तुलनेत त्यात नफा मागील तीन वर्षे कमी राहीला आहे. काहींना तर मोठा तोटा आला. यामुळे अनेकांनी लागवड टाळली, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

Parbhani Water Scarcity: चार लघू सिंचन तलाव आटले

Fertilizer Booking App : ऑनलाइन खत बुकिंगसाठी केंद्र सरकारचा निर्णय

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT