Agriculture Training Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crop : सोयाबीन, गव्हाला मका पर्याय ठरेल : कुलगुरू डॉ. गडाख

Dr. Sharad Gadakh : शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

Team Agrowon

Buldhana News : गहू आणि सोयाबीन पिकाला मका हे पर्यायी पीक वरदान ठरू शकते. जर गव्हापेक्षा मका पीक घेतले तर अडीच पट जास्त उत्पादन नक्कीच मिळेल. शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठनिर्मित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

जिल्ह्यातील मासरुळ येथे कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्राच्या पुढाकाराने मक्याच्या संकरित ‘पीडीकेव्ही आरंभ’ या वाणाचा शेती दिन आणि प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम झाला. या वेळी अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. गडाख बोलत होते.

या वेळी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सी. पी. जायभाये, मका पैदासकार डॉ. दिनेश कानवडे, कृषी महाविद्यालय तथा तंत्र विद्यालयाचे प्रमुख डॉ. सतीशचंद्र जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल तारू, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी दीपक पटेल, तालुका कृषी अधिकारी श्री. सुरडकर व मासरूळचे सरपंच मधुकर महाले, गणेश पैठणकर, डॉ. देशमुख, डॉ. प्रवीण देशपांडे, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे ज्ञानेश्वर खरात उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, की मका पिकाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे असून हे तंत्रज्ञान संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे. ‘विकेल ते पिकेल’ हा दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांची पुढील वाटचाल असावी. कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या मका पिकाच्या संकरित पीडीकेव्ही आरंभ वाणाची २५ प्रात्यक्षिके या गावात झाली होती.

त्यामुळे हरिभाऊ सिनकर यांच्या शेतावर मका पीक पाहणी व शेती दिन कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक डॉ. सी. पी. जायभाये यांनी केले. मनोजकुमार ढगे यांनी मका पीक हे आपल्या जिल्ह्यासाठी वरदान असून या पिकावर कापणी पश्चात मूल्यवर्धन, गटशेतीद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचे आवाहन केले. डॉ. दिनेश कानवडे यांनी मका पिकाचे हे वाण इतर वाणांपेक्षा कसे सरस असून कीड रोगांसाठी प्रतिकारक्षम व उत्पादनक्षम आहे हे सांगितले. हरिभाऊ सिनकर यांनी मका पिकाबद्दल मनोगत व्यक्त करताना एकरी ४२ क्विंटल उत्पादन मिळाल्याचे सांगितले.

डॉ. उंदीरवाडे यांनी खासगी कंपनीच्या मका जातींपेक्षा पीडीकेव्ही आरंभ श्रेष्ठ असल्याबाबत सांगत या पिकाचे तंत्रज्ञान उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राद्वारे वाणाचा प्रचार व प्रसार सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रगतिशील शेतकरी शेषराव किसन सावळे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण देशपांडे तर आभार डॉ. अनिल तारू यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT