Union Minister of State Prataprao Jadhav Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पीकविमा नुकसान भरपाईत पारदर्शकता ठेवा : जाधव

Union Minister of State Prataprao Jadhav : शेतकऱ्यांना पीकविमा हा आधार असल्याने नुकसानीचे पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत,’’ असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

Team Agrowon

Buldhana News : ‘‘खरीप हंगामात पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा हा आधार असल्याने नुकसानीचे पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत,’’ असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. श्री. जाधव म्हणाले, ‘‘खरीप हंगामात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यात २९ परिमंडलातील पिकांचे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी किंवा इतर कामांसाठी पीकविमा शेतकऱ्यांना आधार असल्यामुळे कृषी विभागाने पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करावेत.

त्यात पारदर्शकता ठेवावी. शेतकरी मोठ्या संख्येने पीकविमा काढतात. मात्र, त्याप्रमाणात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पंचनामे काळजीपूर्वक करावेत. बियाणे किंवा खताबाबत तक्रारी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.

यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्यानंतर तातडीने प्रस्तावावर कारवाई करावी. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच नॅनो खतांचा चांगला फायदा होत असल्याने याबाबत जनजागृती करावी.’’

‘‘शेतकऱ्यांना पीककर्ज हा आधार असल्याने बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी सकारात्मक असावे. आतापर्यंत केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल, यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. कर्जाची कागदपत्रे बँकेत सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोकण द्यावे,’’ अशा सूचना जाधव यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT