Pune News : महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा सुपडासाफ झाला आहे. २८८ जागांपैकी २२९ जागांवर भाजपनेतृत्वातील महायुती आघाडीवर आहे. तर महविकास आघाडी फक्त ४६ जागांवर आघाडी आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. नव्या सरकारचा शपथविधी पुढील ७२ तासात होण्याची शक्यता असून वानखेडे स्डेडियम किंवा शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीने महायुतीला रोखले होते. पण आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने मविआला नेस्तनाबूत करत जोरदार मुसंडी मारली आहे. सध्या महायुती २२९ जागांवर महायुती आघाडीवर असून भाजप १३३ जागांवर आघाडी आहे.
तर शिंदे सेना ५६ आणि अजित पवार गटाला ४० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना ७५ चा आकडा देखील गाठता आलेला नाही. यामुळे यंदा विरोधीपक्ष नेताच नसेल अशी नामुष्की मविआवर आली आहे.
दरम्यान आता राज्यातील जनतेना नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची उत्सुकता लागली असून नव्या सरकारचा शपथविधी सोमवार (ता.२५) किंवा मंगळवारी (ता.२६) होण्याची शक्यता आहे.
नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्डेडियम किंवा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता आहे. तर नव्या आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पण मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा फैसला दिल्लीत होईल. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत चर्चा करून चेहरा ठरवू असेही म्हटले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संगमनेरमधून झाला आहे. तिवसामधून यशोमती ठाकूर यांना देखील पराभवाचा धक्का बसला असून पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. बाळासाहेब थोरांतासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते.
एकीकडे साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांच्यासमोर मोठे आव्हान असून ते फक्त ५३५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे आव्हान आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार देखील ब्रह्मपुरी मतदारसंघातून ४ हजारांच्या आघाडीवर आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.