Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar Press ConferenceAgrowon
Published on
Updated on

Pune News : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत असून महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करताना, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक होत असून हा विजय जबाबदारी वाढवणारा असल्याचे म्हटले आहे.

कॉमन मॅनला सुपर मॅन करण्याचे प्रयत्न : शिंदे

गेल्या सव्वा दोन वर्षात आम्ही जे काम केले, जे निर्णय घेतले, ते निर्णय न भूतो न भविष्यातील होते. महाविकास आघाडीने बंद पाडलेली कामे आम्ही सुरू केल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर टिका केली आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, कारशेड आणि मेट्रोचे काम मविआने बंद पाडले. मात्र आम्ही ही कामे सुरू केलीत आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले. हे आमच्या भाग्यात होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

तसेच राज्याने आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या पण ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. लोकांनी महायुतीवर प्रेमाचा वर्षावर केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि शेकऱ्यांनी भरभरून प्रेम दिले. मतदान केलं. यामुळे यांचे आभार मानत असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून कामं केले असून अनेक कल्याणकारी योजना दिल्या. यात लाडकी बहीण, लाडका भाऊ, ३ मोफत गॅस देण्यासह शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिंदे यांनी, आमचा उद्देश राज्याला पुढे नेण्याचा असून आम्ही सर्वसमान्यांचे सरकार आणले. यासाठी मोदींनी मोठे सहकार्य केले. केंद्राने लाखो कोटीं रूपयांचे सहकार्य केलं. आम्ही अडीच वर्षात १३४ सिंचनाच्या योजना राज्याला दिल्या असून मविच्या काळात फक्त ४ होत्या, असे म्हटले आहे.

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference
Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

आम्ही कॉमन मॅनला सुपर मॅन करण्यासाठी प्रयत्न केले. पण राज्यातील जनतेनं आम्हाला सुपर मॅन म्हणून मतदान केलं. याआधी विरोधकांनी या ना त्या कारणांनी भीती दाखवण्याची, फेक नरेटीव्ह बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही यांना कामातून उत्तर दिले. आता राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लाडकी बहिण योजनेवरून टीका करणाऱ्यांना सावत्र भावांना लाडक्या बहि‍णींनी जोडा दाखवल्याचीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

विश्वासाला तडा जावू देणार नाही : फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा असल्याचे म्हटले आहे. तर आता आम्हाला महाराष्ट्रात खूप काम करावं लागणार असून राज्यातील जनतेचा विश्वासाला तडा जावू देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आमच्या बहिणींनी अंडरकरंट दिला; अजित पवार

राजकारणात आल्यापासून पहिल्यांदाच असे यश मिळाले असून यामुळे आम्ही हुरळुन जाणार नाही. आमच्यावर जनतेनं टाकलेला विश्वास मोठा असून त्याला तडा जाऊ देणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी विरोधकांवर टीका करताना, बॅलेट पेपरची आता मागणी करणाऱ्या विरोधकांनी लोकसभेला देखील अशी मागणी करायला हवी होती असा टोला लगावला आहे. लाडकी बहीण गेमचेंजर ठरली असून आम्हाला आणखी काम करायचं आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक शिस्त आणावी लागेल. आमच्या पाठिशी केंद्र सरकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com