Mahavitaran  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Issue : वीज समस्या निराकरणासाठी महावितरणची व्हॉटसअॅप सेवा

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ग्राहक हिताला प्राधान्य देवून महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र व्हॉटसअॅप क्रमांक देण्यात आला आहे. आता ग्राहकांना आपल्या विजेच्या समस्या थेट त्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवता येतील.

ग्राहकांनी ८४८५८९९३९९ या व्हॉटसअॅप क्रमांकावर आपल्या समस्या तक्रारी पाठविल्यानंतर त्या महावितरणच्या संबंधित विभागांच्या प्रमुखांना पाठवून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी ८४८५८९९३९९ हा व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

माहिती, तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटसअॅपच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठविता येणार आहेत.वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशसह माहिती/तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटसअॅपद्वारे माहिती द्यावी.

तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटसअॅप नाहीत त्यांनी एसएमएसद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. व्हॉटसअॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित मंडल व विभागीय कार्यालय पाठविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारदारांना व्हॉटसअॅपद्वारेच दुरूस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी / निधी किंवा शिफटींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात येणारआहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT