Mahavitaran Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Recovery : थकीत १६६ कोटी वीजबिल वसुलीसाठी महावितरण आक्रमक

Mahavitaran Update : वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या आठ हजार १०३ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला परिमंडलांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत असलेल्या विजबिलाचे १६६ कोटी रुपये वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या आठ हजार १०३ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत असलेल्या वीजबिलाची संपूर्ण रक्कम भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण अकोला परिमंडलातील कृषी ग्राहक वगळून उच्चदाब आणि लघूदाब वर्गवारीतील सुमारे १३ लाख ७४ हजार ७९७ ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक ९ लाख ५२ हजार ५७५, वाणिज्यिक ७० हजार ६७१, औद्योगिक २५ हजार ३०९, आणि इतर वर्गवारील १९ हजार ५७५ ग्राहकांचा समावेश असून त्यांना महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येतो.

परंतु परिमंडलात विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे १६६ कोटी रुपये वीजबिलाचे थकल्यामुळे महावितरणची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वसुलीसाठी महावितरणने मोहीम अधिक तीव्र केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

परिमंडलात विविध वर्गवारीतील १६६ कोटी १६ लाख रुपयांच्या थकबाकीमध्ये १२९ कोटी २८ लाखांची थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. वाणिज्यिक ग्राहकांकडे १५ कोटी २ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे १२ कोटी २२ लाख आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकाकडे ९ कोटी ६३ लाख वीज बिलाचे थकले आहेत.

८१०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही वसुलीचे असलेले व्यस्त प्रमाण बघता थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मोहीम सुरू केल्यापासून आतापर्यंत ८ हजार १०३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्याही दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. याशिवाय ग्राहक महावितरण मोबाईल ॲप, महावितरण संकेतस्थळावरूनही वीजबिल भरू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT