APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election : नांदेड जिल्ह्यातील सहा बाजार समितीत ‘महाविकास’ला यश

Nanded APMC Election Update : लोहा येथील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

Gopal Hage

Nanded News : मुखेड, माहूर, बिलोली, कुंडलवाडी, लोहा व उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल रविवारी घोषित झाला. लोहा येथील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

माहूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडून राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे. तर बिलोली, कुंडलवाडी, उमरीतही महाविकास आघाडी सत्तेत आली आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहा बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात शनिवारी (ता. ७) झाली. या निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. ८) जाहीर झाला.

यात मुखेड येथील बाजार समितीच्या १८ जागांपैकी १७ जागांवर भाजप व मित्र पक्षाने विजय मिळविला आहे. केवळ १ जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. माहूर येथे भाजप, काँग्रेसच्या पॅनेलला ४ तर राष्ट्रवादीने १४ जागा मिळविल्या.

बिलोली येथे काँग्रेस व मित्र पक्षाला १७ जागा मिळाल्या तर भाजप महायुतीला एका जागेवर समाधान मानावे लागले. कुंडलवाडी येथे महाविकास आघाडीच्या पॅनेलला १७ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळाली.

लोहा येथे महाविकास आघाडीने सर्वाधिक १६ जागा मिळवल्या. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. तर उमरी येथे महाविकास आघाडीला १८ जागा मिळाल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Loan Concessions: उद्योगपतींप्रमाणे हव्यात शेतकऱ्यांना सवलती: शरद पवार

Farmer ID Registration Challenges: चाळीस टक्के पीकक्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना; ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा

Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव

Maharashtra Monsoon Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT