Weather Station Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Station : गावात हवामान केंद्र उभारणीसाठी महावेध प्रकल्पाला पाच वर्षांची मुदत वाढ

WINDS Project : केंद्र सरकारच्या विंडस् प्रकल्पा अंतर्गत गाव पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने महावेध प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे.

Dhananjay Sanap

Wather Update : ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेध प्रकल्पाला पाच वर्षे मुदतवाढ मंगळवारी (ता.१७) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विंडस् प्रकल्पा अंतर्गत गाव पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने महावेध प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते.

शेतकऱ्यांना गावांमध्ये हवामानाची अचूक मिळावी, तसेच शेतकऱ्यांना कृषी सल्ला आणि मार्गदर्शन मिळावं, यासाठी महावेध प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मंडळ स्तरावर हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या हवामान केंद्रातून पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, त्याची दिशा आणि आर्द्रता याची माहिती मिळते. या माहितीचा वापर विविध संस्था आणि प्रकल्पाकडून केला जातो. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतही त्याची माहिती वापरली जाते.

२०१७ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि यांच्याकडून केली जाते. या संस्थेकडून हवामान केंद्राचा पुरवठा केला जातो. परंतु मागील काही वर्षांमध्ये या प्रकल्पा अंतर्गत महसूल मंडळावरील कामगिरी साधारणच राहिलेली आहे.

राज्यात शेतकऱ्यांना अचूक अंदाज मिळण्यासाठी या हवामान केंद्राचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक सल्ला आणि मार्गदर्शन करता येऊ शकतं, असं अभ्यासक सांगतात. तर ग्रामपंचायत स्तरावर केंद्र उभारून हवामानाची प्रत्येक माहिती गोळा केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राज्यात या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती आणि सल्ला मिळू शकतो, असा राज्य सरकारचा दावा आहे. तर शेतकऱ्यांनाही अचूक हवामान अंदाजाची गरज आहे. कारण हवामान बदलात शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसू लागला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरुन जोखीम व्यवस्थापन करता येऊ शकतं, असं तज्ञ सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT