Shri M Agrowon
ॲग्रो विशेष

Guru Paduka Darshan 2025: मुंबईत भक्तीचा महासंगम! श्री गुरूंच्या २१ पादुकांचे पुण्यदर्शन

Spiritual Festival : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ८ व ९ मार्च रोजी ‘श्री गुरू पादुका दर्शन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Mumbai News: ‘सकाळ माध्यम समूहा’ने ८ आणि ९ मार्च रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे श्री गुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केला असून, एकाच छताखाली २१ श्री गुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या उत्सवादरम्यान रविवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आध्यात्मिक मार्गदर्शक श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.

पद्मभूषण श्री एम हे योगी असून, सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू आहेत. समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि जागतिक कीर्तीचे वक्ते असलेले श्री एम ‘आध्यात्मिक एकांतवास’ तसेच ‘वेद’ या विषयांवर जगभरात व्याख्याने देत असतात. ते उपस्थितांशी संवाद साधतात आणि त्यांच्या विविध शंकांचे निराकरण करतात. त्यांचे विचार ऐकण्याची संधी या उत्सवानिमित्त ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्राची भूमी संत-महात्म्यांच्या विचाराने समृद्ध असून, मराठी मुलूखवासीय आपापल्या श्रद्धास्थानांच्या भक्ती सुगंधासाठी सदैव व्याकूळ असतात. प्रत्येकालाच श्रद्धेच्या ठिकाणी जाऊन श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे शक्य नसते. त्यामुळे हा ‘भक्तीचा महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी (८ मार्च) सकाळी १० वाजता या महोत्सवात ‘भक्ती शक्ती व्यासपीठ’चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवाला राज्यभरातून आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गुरुसेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे निश्‍चित केले असून, त्यांच्यासह सर्वसामान्य भाविकही या सोहळ्यासाठी आतुर झाले आहेत.

ऑनलाइन नोंदणी सुरू

उत्सवात पोहचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनरीय रेल्वेस्थानके आहेत. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्रीपादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचे क्यूआर कोड स्कॅन करून, आपला प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका

ज्ञानेश्वर महाराज

संत मुक्त्ताई

नामदेव महाराज

संत जनाबाई

नरहरी सोनार

सेना महाराज

सावता माळी

एकनाथ महाराज

तुकाराम महाराज

संत निळोबाराय

श्री महेश्वरनाथ बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सद्‌गुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT