Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्ष बागायतदार संघाची शिवार फेरी

द्राक्ष बागानची संख्या वाढविण्यासाठी आता संघाच्या संचालकांनी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Team Agrowon

Osmanabad Grape News : तालुक्यात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाच्यावतीने शिवार फेरी काढण्यात आली. परिसरातील द्राक्ष बागांना (Grape Orchard) भेटी देऊन सल्ला देण्यात आला. राज्य बागायतदार संघाच्या (Maharashtra State Grape Growers Association) या शिवार फेरीत बागांच्या अनेक अडचणीवर चर्चा करण्यात आली.

गावाच्या विकासाबरोबरच शेतकऱ्यांनी बागांमध्ये सुधारणा करण्याच्या, त्यांना जागतिक बाजारपेठेत काय सुरू आहे, याची माहिती होण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाकडून शिवार फेरीची संकल्पना राबविली जात आहे.

त्या अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यामध्ये द्राक्ष बागांची संख्या मोठी असल्याने तालुक्यातील अनेक द्राक्ष बागांना भेटी देऊन त्यांना आवश्यक त्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सांगली व नाशिक येथील बागांच्या उत्पादनाच्या तुलनेत या ठिकाणी होत असलेले नवीन प्रयोग याबाबतही काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षी उत्पादन घटल्याने काही अडचणी समोर आल्या असून त्यावर सुद्धा शास्त्रीय उपाय शोधून काढण्यासंदर्भात चर्चा झाली.

द्राक्ष बागानची संख्या वाढविण्यासाठी आता संघाच्या संचालकांनी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ज्या शेतकऱ्यांना यासंदर्भात अडचणी येत असतील तर त्यांना संचालकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील संचालक यासाठी वेळ देतील व शेतकऱ्यांच्या अडीअडीचणी ऐकून घेऊन त्याचे निरसन देखील करणार असल्याचे यावेळी सांगितले. सुरवातीला संघाने कौडगाव येथील द्राक्ष बागायतदार शंकर थोरात यांच्या बागेला भेट देण्यात आली.

त्यानंतर उपळे (मा.)येथील प्रशांत पाटील, संघाचे संचालक विक्रम काकडे यांच्याही बागांना भेटी देण्यात आल्या. जागजी येथे बालाजी देवळकर, व लासोना येथील भाऊसाहेब यादव यांच्या शेतात शिवारी फेरीची सांगता झाली.

या शिवार फेरीसाठी द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, सचिव गौस शेख, संचालक महादेव वडजे, बाळासाहेब झांबरे,प्रमोद झांबरे, राहुल सुरवसे, लालासाहेब देशमुख, राजाभाऊ शेळके, विक्रम काकडे या सर्व संचालकांना शिवार फेरीमध्ये मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT