Ajit Pawar Agrwon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Budget 2025 : राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात? अजित पवार यांनी सांगितली तारीख

Budget 2025 : राज्यातील खातेवाटपाचा तिथा सुटला असून शनिवारी (ता. २१) रात्री खातेवाटपं झाले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची घोषणा केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Ajit Pawar : राज्यात याच महिन्याच्या ५ तारखेला महायुतीचे सरकार आले असून १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता खातेवाटप देखील शनिवारी (ता.२१) झाले असून अर्थसंकल्प कधी होणार असा नवा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प -२०२५ हा ३ मार्च रोजी सादर केला जाईल अशी माहिती दिली आहे. ते आज (ता.२२) बारामतीत बोलत होते.

राज्यात याच महिन्याच्या सुरूवातीला महायुतीचे सरकार आले असून अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र खातेवाटप झाले नव्हते. पण ते देखील शनिवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर अजित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी पहाटेच बारामतील विविध कामांचा आढावा घेतला.

एका उद्घाटन समारंभात त्यांनी ३ मार्चला राज्याचे अर्थसंकल्प होईल अशी माहिती दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले, आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यात अनेक कामे थांबली आहेत. त्यांना आता गती द्यायची आहे. आता खातेवाटप झाले असून सर्वच जन कामाला लागतील.

सध्या महायुतीत मंत्र्यांची सख्यां जास्त झाल्याने राज्य मंत्र्यांचा आकडा कमी आहे. सध्या राज्यात ६ राज्यमंत्री आहेत. तर एका मंत्र्याला एकच खाते देण्यात आलं आहे. सध्या मंत्रीपदावरून अनेकांची नाराजी आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल. आता दोन-एक दिवसात मंत्रालयात जाऊन खात्यांचा कारभार हाती घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

३ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल. त्यांना घेऊन अर्थसंकल्प सादर करायचा आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT