SSC Result 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

SSC Result 2024 : अखेर प्रतिक्षा संपली! १० वीचा निकाल २७ मे रोजी

Maharashtra Board 10th Result : चार दिवसांपुर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला. यानंतर यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्या निकालाच्या तारखेकडे लागले होते. तो आता याच महिन्यात दोनच दिवसांनी लागणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ वीचा निकाल चार दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. ज्यात कोकण विभागासह मुलींनी बाजी मारली. यानंतर मात्र १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निकालाची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे. तर आता १० वीचा निकाल कधी अशी विचारणा होत होती. ती प्रतिक्षा आता संपली असून १० वीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. १० वीचा निकाल २७ तारखेला लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली असून निकाल दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीची परीक्षा यंदा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत पार पडली होती. यावेळी पेपर फुटी आणि कॉपी होऊ नये म्हणून बोर्डाने विशेष काळजी घेत जय्यत तयारी केली होती.

यंदा बोर्डाने घेतलेल्या १०ची च्या परीक्षेस राज्यातील १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थी बसले होते. यादरम्यान चारच दिवसांपूर्वी बोर्डाकडून १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर आता २७ मे रोजी १० वीचा निकाल लागणार आहे. यामुळे १० वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. पण मार्कशीट काही दिवसांनंतर दिली जाईल. तर १२वीच्या परीभेत राज्यात मुलींनी बाजी मारली होती. पण आता १० ची परीक्षेत मुली बाजी मारतात की मुले हे पाहण्यासारखे असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NCCF: ‘एनसीसीएफ’चे शाखा व्यवस्थापक ग्रोवर निलंबित

Agriculture Policy: केंद्राच्या धोरणांचा व्यापाऱ्यांनाही फटका

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांच्या बेमुदत आंदोलनाला किसान सभेचा पाठिंबा

Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन

Pesticide Cost: कीटकनाशक फवारणी खर्चाने शेतकरी हैराण

SCROLL FOR NEXT