ॲग्रो विशेष

Women ST Bus Discount : महिलांना सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात; परिवहन मंत्री सरनाईक यांचं विधान

Transport Minister Sarnaik: सरनाईक यांनी महिला आणि ज्येष्ठा देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं सांगितलं. तसेच गावाखेड्यापर्यंत एसटी पोहचली पाहिजे, ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले.

Dhananjay Sanap

Maharashtra ST Faces Losses : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरकांना सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात आल्याची कबुली राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये केलं आहे. व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात मंत्री सरनाईक बोलत होते. त्यावेळी पत्रकारांना एसटीमध्ये सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे महिलांसाठी देण्यात येणाऱ्या ५० टक्के तिकीट सवलतीला राज्य सरकार ब्रेक लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, "लाडक्या बहिणींना बसमध्ये ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे एसटीची अशी परिस्थिती झाली आहे. अशी सवलत आपण सर्वांना देत बसलो तर मला वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल." असंही सरनाईक यांनी सांगितलं.

सरनाईक यांनी महिला आणि ज्येष्ठा देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं सांगितलं. तसेच गावाखेड्यापर्यंत एसटी पोहचली पाहिजे, ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. मात्र या योजनेमुळेच एसटी तोट्यात आल्याचे आरोप केले जात होते. परंतु राज्य सरकार मात्र या आरोपांना फेटाळत होतं. आता मात्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथील कार्यक्रमात याबद्दल कबुली दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी राबवलेल्या योजनांचे निकष अधिक कठोर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता एसटीच्या सवलतीला ब्रेक लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचा आर्थिक भार वाढल्याने योजनांचा लगाम आवळण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT