S.T. Mahamandal : तोट्यात रुतलेली एसटी धावतेय नफ्याकडे

S.T Mahamandal Profit : सातत्याने आर्थिक तोट्यात असणारी एसटी नव्या वर्षात किमान नफा मिळवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत दिसत आहे.
ST Bus
ST BusAgrowon

Satara News : सातत्याने आर्थिक तोट्यात असणारी एसटी नव्या वर्षात किमान नफा मिळवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत दिसत आहे. प्रवासी संख्या वाढत असल्याने एसटीच्या महसुलात वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारने शून्य अर्थसाहाय्य केले आहे.

एसटीचे प्रवाशेत्तर सरासरी वार्षिक उत्पन्न ६७ कोटी आहे. कोरोनाकाळात एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी होता. त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटींवर आला आहे. तब्बल १० वर्षांनी एसटीचा नफा नोव्हेंबर महिन्यात १७ कोटी रुपयांचा झाला आहे.

एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचे दळणवळणाचे मुख्य साधन आहे. परिवहन महामंडळाची एसटी बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते.

त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. तत्कालीन सरकारने महिना ३०० कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता.

ST Bus
Free ST Pass : मोफत एसटी पाससाठी विद्यार्थिनींची वणवण

राज्य सरकारने राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने एसटीची आर्थिक चाके वेगाने फिरू लागली आहे. अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के प्रवासी तिकिटात सवलत या दोन योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे एसटीच्या महसूलातही वाढ होत आहे.

दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली होती. तीही एसटीच्या फायद्याची ठरली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळाच्या सवलत मूल्यासहित एकूण उत्पन्न सुमारे सहा हजार ४४७ कोटी ५७ लाख होते. त्यात सवलत मूल्याचे दोन हजार १८२ कोटी ८० लाख रुपये राज्य सरकारने एसटी महामंडळाला अदा केले.

२३७ कोटी २६ लाखांचे अनुदान सरकारने दिले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळाचा एकूण खर्च सहा हजार ९४१ कोटी ४५ लाख असून एकूण तूट ७१७ कोटी ३७ लाख आहे. या व्यतिरिक्त एसटीचे प्रवाशेत्तर सरासरी वार्षिक उत्पन्न ६७ कोटी आहे. कोरोनाकाळात एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी होता. त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटींवर आला आहे.

ST Bus
ST Bus Booking : : शैक्षणिक सहलीसाठी ३०६ बसेसचे बुकिंग

ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी वाढले

तीन लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला आहे. त्या सवलतीचे एक हजार ४४८ कोटी ९८ लाख रुपये राज्य सरकारने एसटीला दिले आहेत. महिन्याला सरासरी एक कोटी ३२ लाख ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात.

याशिवाय ४० कोटी ३४ लाख महिलांनी आतापर्यंत एसटीने प्रवास केल्याने सरकारने एक हजार १४४ कोटी २० लाख रुपये एसटीला दिले आहेत. महिन्याला सुमारे चार कोटी ४८ लाख महिला एसटीने प्रवास करतात.

महामंडळाचे उत्पन्न, खर्च, राज्य सरकारचे अर्थसाहाय्य व सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती (रक्कम कोटीमध्ये)

महिना ----महामंडळ उत्पन्न -सवलत मूल्य -सवलत मूल्यासह उत्पन्न -वेतनासाठी सरकारचे अर्थसाहाय्य- सवलत प्रतिपूर्ती रक्कम-- एकूण जमा

एप्रिल --४९९.५१ -२७१.९३-- ७७१.४४ --०.०० --०.०० ---४९९.५१

मे --६०७.१६ --- ३२०.८२-- ९२७.९८ --१२०.६०-- २३१.१९ --९५८.९५

जून ---४८१.७९--- ३३४.५२ ---८१६.३१ ---८२.८४ ---२७१.९३ ---८३६.५६

जुलै ---३८४.१७ ---३६९.०७ --७५३.२४ --३३.८२ ---३२१.१८ ---७३९.१७

ऑगस्ट --४७८.२७ ---३२९.२४ ---८०७.५१ --०.०० ---३३४.५२ ---८१२.७९

सप्टेंबर ---३९४.२० ---३५९.२४--- ७५३.४४-- ०.०० ---३५३.३२ ---७४७.५२

ऑक्टोबर ---४०२.९३ ---३३०.७४ ---७३३.६७ ---०.०० ---२८२.६८ ---६८५.६१

नोव्हेंबर ---५५५.९९ ---३२७.९९ ---८८३.९८--- ०.००--- ३८७.९८-- ९४३.९७

एकूण ---३८०४.०२ --२६४३.५५ --६४४७.५७-- २३७.२६ ---२१८२.८० ---६२२४.०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com