Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Export : महाराष्ट्रातून डाळिंबाची २२ हजार टन निर्यात

Pomegranate Market : नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहे. राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार ३६० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहे. राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार ३६० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत राज्यातून ७८ टक्के निर्यात होत असून निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, अशी माहिती कृषी विभागाने सांगितले.

राज्यात डाळिंबाची लागवड १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. कृषी विभागामार्फत डाळिंब निर्यातीसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे डाळिंब निर्यात वाढीस चालना मिळत आहे. राज्यातून डाळिंबाची युरोपियन देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, थायलंड, नेपाळ, मलेशिया यासह अनेक देशांत निर्यात होते. गतवर्षी राज्यातून ५६ हजार ४०७ टन डाळिंबाची निर्यात झाली होती.

राज्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंब शेती समोर अखंड अस्मानी संकटांची मालिका सुरू आहे, अशा परिस्थितीत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करत बागा साधल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला दोन वर्षांपासून चांगले दर मिळत असले तरीही शेतकरी डाळिंबाची निर्यातीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२४-२५ या वर्षातील नऊ महिन्यांत राज्यातून २२ हजार ३६० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. युरोपियन देशासह आखाती देश, बांगलादेशातून डाळिंबाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात डाळिंबाची निर्यात वाढेल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा देशातून डाळिंब निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेशांतील शेतकरी पुढे आले आहेत. देशातून २१ हजार ८३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात २१ हजार ७९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, राज्यातील सर्वाधिक नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे.

४५ शेतीशाळा राबविणार

हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत समाविष्ट डाळिंब पिकांवरील कीड रोगांच्या निरीक्षण नोंदणीसाठी व त्यावर आधारीत पीक संरक्षण सल्ला वेळेत दिल्याने कीड व रोगाचे वेळेत नियंत्रण करणे शक्य होते. या योजनेअंतर्गत फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, खोड भुंगे (शॉट होल बोरर), तेलकट डाग, मर या कीड व रोगांचे सर्वेक्षण करण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये डाळिंब पिकाच्या एकूण ४५ शेतीशाळा राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

डाळिंब निर्यातीसाठी जिल्हानिहाय नोंदणी

जिल्हा....नूतनीकरण...नवीन...एकूण

अहिल्यानगर...१३०५...२४१२...३७१७

बुलडाणा...२...१...३

नाशिक...२३...६६८...६९१

पुणे....२४०...११७२...१४१२

सांगली...१६५७...१०४६...२७०३

सातारा...३...९...१२

सोलापूर...५५५३....७७०३...१३२५६

राज्यातून डाळिंबाची निर्यात चांगली झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजार पेठेत डाळिंबाला दर चांगले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी डाळिंबाची निर्यात स्थिती कशी राहील याचा अंदाज आता सांगणे कठीण आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
प्रतिकूल परिस्थितीत दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेत आहे. डाळिंबाची मागणी असल्याने निर्यात करण्यास पुढे येत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत.
विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी तडवळे, ता. आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

India-New Zealand FTA: न्यूझीलंडमधून आयात वाढणार?, काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकरी चिंतेत, केंद्रावर आश्वासन मोडल्याचा आरोप

Flood Damage Compensation: घोषणा ४७ हजारांची; मदत केवळ पाच हजार

Rabi Crop Competition: रब्बीसाठी ‘कृषी’ची पीक स्पर्धा

Onion Cultivation: देवणीत कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

SCROLL FOR NEXT