Farmers Support Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Support: जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

Field Visits: जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी शेताच्या बांधावर पोहोचले व शेतकऱ्यांशी बोलले. खरीप हंगामाच्या तयारीविषयी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन तुमच्या सोबत आहे, असा धीरही दिला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी शेताच्या बांधावर पोहोचले व शेतकऱ्यांशी बोलले. खरीप हंगामाच्या तयारीविषयी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन तुमच्या सोबत आहे, असा धीरही दिला.

जिल्ह्यातील अधिकारी शेतांच्या बांधांवर पोहोचल्याने शेतकरी-अधिकारी सुसंवाद होताना दिसला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या दृष्टीने शंका समाधान, बी-बियाणे, खते त्याचप्रमाणे पीककर्ज प्रक्रिया, शेतरस्ता आदी विषयांवरील तक्रारीवरील शंका, समाधान करण्यासाठी अधिकारी बांधावर गेले. सोमवारपासून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी हे स्वतः लक्ष्मण खंडेराव रहाणे, गट नं १२ नांदगाव (ता. वैजापूर) या शेतकऱ्याच्या शेतात गेले.

महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख, विविध बॅंकांचे अधिकारी यात सहभागी झाले. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा, मालकी हक्क, फेरफार, खत, बी-बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे. यामध्ये महसूल, कृषी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख, वन विभाग या विभागाचे सर्व अधिकारी तालुकानिहाय नियोजन करून किमान प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देणार आहेत. गावोगावी भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यात याव्यात, असे निर्देशही स्वामी यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT