Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Assembly Constituency : विधानसभेचा आखाडा नवा, खेळाडू जुनेच

Maharashtra Election 2024 : यंदाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार बघितले तर बहुतांश चेहरे जुने आहेत.

Team Agrowon

Akola News : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर फडातील डावपेचांना वेग येईल. यंदाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार बघितले तर बहुतांश चेहरे जुने आहेत. जे नवीन दिसत असतील त्यांनाही राजकीय वारसा मिळालेला आहे. कुणी माजी आमदारांच्या कुटुंबातून आलेले आहे तर कुणी राजकीय दबदबा असलेल्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

अकोला जिल्ह्यात भाजपचा गेली काही वर्षे बोलबाला राहिलेला आहे. यंदाची स्थिती महायुतीच्या उमेदवारांसाठी तितकीशी पोषक दिसत नाही. जनमानसात सत्तेविरुद्धचा रोष कदाचित मतपेटीत परावर्तीत झाला तर यंदा निकाल बदललेलाही दिसू शकतो. दुसरी शक्यता अशी आहे की, जर भाजप म्हणजेच महायुतीला यश मिळाले तरी ते भरभक्कम नसेल असाही एक राजकीय अंदाज दिला जात आहे.

अकोला पूर्वमध्ये विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना भाजपने पुन्हा संधी दिली. सावरकर गेले काही वर्षे जिल्ह्यात संजय धोत्रे यांच्या आजारपणामुळे त्यांच्या अनुपस्थितीत भाजपचा चेहरा म्हणून पुढे आलेले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीत शिवसेनेने (उबाठा गट) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना उतरवले. वंचित बहुजन आघाडीने ज्ञानेश्‍वर सुलताने यांना संधी दिली. अकोला पश्‍चिम या मतदार संघात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली.

गेल्या अनेक निवडणुकांत या ठिकाणी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी ज्या पद्धतीने अकोला पश्‍चिम एकसंध बांधून ठेवले ते अग्रवालांना झेपेल का, असा प्रश्‍न खुद्द भाजपमधूनच उपस्थित होत आहे. या जागेसाठी भाजपमध्ये अनेकांना तिकीट हवे होते. पण अग्रवाल भारी पडले. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसने साजिदखान पठाण यांच्यावर पुन्हा विश्‍वास टाकला.

बाळापूरमध्ये शिवसेनेचे (उबाठा गट) उमेदवार आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध महायुतीत शिंदे सेनेने भाजपमधून ऐनवेळी घेत बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली. येथे वंचितने माजी आमदार ॲड. नतिकोद्दीन खतिब यांना उमेदवारी दिली. अकोटमध्ये भाजपने आमदार प्रकाश भारसाकडे यांना तिकीट दिले. त्यांच्या विरुद्ध माजी आमदार पुत्र महेश गणगणे आहेत. ‘वंचित’ने माजी मंत्री पुत्र दीपक बोडखे यांना उमेदवारी दिली.

बुलडाण्यात चुरस

बुलडाणा मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पूर्वाश्रमीच्या काँग्रेस प्रदेश सचिव व आता शिवसेनेने (उबाठा गट) उमेदवारी दिलेल्या जयश्री शेळके यांच्यात सरळ लढत आहे. मलकापूरमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती (भाजप) विरुद्ध विद्यमान आमदार राजेश एकडे (काँग्रेस) यांच्यात लढाई आहे. जळगाव जामोदमध्ये तीन डॉक्टर उमेदवार आहेत.

येथे डॉ. संजय कुटे (भाजप), डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस) आणि डॉ. प्रवीण पाटील (वंचित) अशी लढाई आहे. खामगावमध्ये आकाश फुंडकर (भाजप) विरुद्ध दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस), सिंदखेडराजा डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार गट) विरुद्ध माजी आमदार शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे गट), चिखलीमध्ये माजी आमदार राहुल बोंद्रे (काँग्रेस) विरुद्ध आमदार श्‍वेता महाले (भाजप), मेहकरमध्ये डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध सिद्धार्थ खरात (शिवसेना उबाठा गट) यांच्यात थेट लढत होणार आहे.

वाशीममध्ये अटीतटीच्या लढती

जिल्ह्यात कारंजामध्ये सईताई डहाके (भाजप) विरुद्ध ज्ञायक पाटणी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), रिसोड-मालेगावमध्ये आमदार अमित झनक (काँग्रेस) विरुद्ध आमदार भावना गवळी (शिवसेना-शिंदे गट) व अनंतराव देशमुख (अपक्ष) यांच्यात लढत होईल. काही ठिकाणी सक्षम बंडखोर असल्याने मतविभाजनावर विजयाची समीकरणे टिकून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT