Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

Crop Loss : शासनाकडून १२ कोटी ३९ लाख ९३ हजार रुपयांच्या भरपाईसाठीचा निधी शासनाकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात मे, एप्रिलमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १९ हजार २९५ शेतकऱ्यांचे ६ हजार ७८४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.

शासनाकडून १२ कोटी ३९ लाख ९३ हजार रुपयांच्या भरपाईसाठीचा निधी शासनाकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Crop Damage
Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत ३७१.०८ हेक्टर फळबागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामे करून वरिष्ठ विभागाकडे अहवाल सादर केला होता. या भरपाईसाठी एक कोटी २६ लाख ६८ हजार ३०० रुपयांच्या निधीची शासनाकडे मागणी केली होती.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी

जुलैमध्ये संततधार पाऊस सुरूच राहिल्यामुळे आणि कृष्णा, वारणा नद्यांच्या पुरामुळे पलूस, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, भात, हळद, भुईमूग पिकांचे नुकसान झाले. या चार तालुक्यातील १८ हजार ३०६ शेतकऱ्यांचे ६४१३ हेक्टरवरील पिके बाधित झाली.

या भरपाईसाठी ११ कोटी १३ लाख २५ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला निधी शासनाकडून मिळाला असून तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातही अतिपावसाचा फटका खरिपातील पिकांना बसला आहे.

यादरम्यान, ५ हजार १३५ शेतकऱ्यांचे २ हजार ५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित पिकांचे पंचनामेही केले आहेत. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी शासनाकडून २ कोटी १७ लाख ६७ हजार रुपयांची निधीची गरज आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com