Samool FPO  Agrowon
ॲग्रो विशेष

Samool FPO : समूल फार्मर प्रोड्यूसर कंपनीला कृषिमंत्र्यांची भेट

Maniokrao Kokate : स्मार्ट प्रकल्पाची मोठी मदत कंपनीला झाली आहे. ध्येयाप्रती धडपड व प्रबळ इच्छा शक्तीमुळेच हे शक्य झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता अरण येथील समूल फार्मर प्रोडूसर कंपनीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट देऊन कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच कंपनीच्या कामाचे कौतुक केले.

माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. कांताप्पा खोत, नोडल अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प आश्‍विनी कुंभार, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, संचालक सुषमा कोल्हाळे, हिमानी कातकर, कीर्ती साठे, देविदास काळे, उमाजी देवकर, मोहन भोसले, दीपक जाधव, संकेत नाईकवडे, अरविंद सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, कंपनीने उद्दिष्ट घेऊन सुरू केलेले काम उत्कृष्ट आहे. स्मार्ट प्रकल्पाची मोठी मदत कंपनीला झाली आहे. ध्येयाप्रती धडपड व प्रबळ इच्छा शक्तीमुळेच हे शक्य झाले आहे. कंपनीचे अध्यक्ष बालाजी गाडेकर यांची धडपड यात महत्त्वाची आहे,

सरकारने आणलेल्या योजनांचा पुरेपूर फायदा शेतकरी घेत आहेत, याचा मला आनंद होतोय, ही एक समाधानाची बाब आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भविष्यकाळ खूपच चांगला असेल, शासन कायम शेतकरी हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, अशी ग्वाही या वेळी त्यांनी दिली.

कंपनीचे अध्यक्ष बालाजी गाडेकर व सौ. वैशाली बालाजी गाडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. समूल फार्मर प्रोड्यूसर कंपनीने विविध प्रकारच्या फळे व भाजीपाला यांच्या ग्रेडिंग अँड सॉर्टिंगचा १० कोटी रुपयांचा प्रकल्प उभा केला आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत पाच कोटीच्या मर्यादित ६० टक्के प्रमाणे ३ कोटी अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. प्रा. वाय.जी. भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संजय ढवळे-पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT